नवी मुंबई -शिवसेना पक्षाचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू पाटील यांच्यावर माथेफिरूने प्राणघातक हल्ला केला. यानंतर याप्रकरणी त्या माथेफिरुस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवसेना नवी मुंबई उपशहर अध्यक्षावर माथेफिरूचा हल्ला - rabale police new mumbai
शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक राजू पाटील यांच्यावर माथेफिरूने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी त्या माथेफिरुस रबाले पोलिसांनी अटक केली आहे.
शिवसेना नवी मुंबई उपशहर अध्यक्षावर माथेफिरूचा हल्ला
शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक राजू पाटील यांचे ऐरोली सेक्टर 2 या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. जनतेच्या अडचणी सोडविण्याचे कार्य या कार्यालयातून होत असते. अशाच प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी ते जनसंपर्क कार्यालयात आले असताना अचानक एका माथेफिरुने त्यांच्यावर आणि कार्यालयावर हल्ला करत शिवीगाळ केली.
या घटनेची रबाले पोलिसांनी दखल घेत तत्काळ त्या माथेफिरूला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.