नवी मुंबई -पन्नास किलोपेक्षा जास्त अधिक वजनांचा भार माथाडी कामगारांवर टाकू नये, असा नियम असतानाही नवी मुंबईतील वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या नियमांचे काही व्यापाऱ्यांकडून उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे आज (दि. 4) कांदा-बटाटा मार्केटमध्ये माथाडी वर्गाने कामबंद आंदोलन पुकारले आहे.
50 किलोपेक्षा अधिक भार व्यापारी वर्गाला सोसावा लागत आहे
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी आणलेल्या मालाचे वजन 50 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन असू, नये असा शासनाने नियम केला आहे. हा नियम मसाला, फळ-भाजी व्यापारी पाळतात. मात्र, या नियमाला कांदा-बटाटा मार्केटमधील केराची टोपली दाखवण्यात आली असून पन्नास किलोपेक्षा जास्त भार येथील माथाडी कामगारांवर टाकला जातो. यामुळे माथाडी कामगार वर्गाने कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.