नवी मुंबई - राज्य सरकारकडे माथाडी कामगारांच्या न्याय प्रश्नांची अनेकदा निवेदन देऊनही त्यांची सोडवणूक करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येत्या बुधवारी २६ फेब्रुवारीला माथाडी कामगार लाक्षणिक संप करणार आहेत. या संपात सर्व माथाडी, व्यापारी, वाहतूकदार यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन चे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी केले आहे.
'मंत्र्यांसह कामगार आयुक्तांच्या माध्यमातून माथाडी चळवळीला संपवण्याचा प्रयत्न; - Mathadi Workers shat down
राज्य सरकारकडे माथाडी कामगारांच्या न्याय प्रश्नांची अनेकदा निवेदन देऊनही त्यांची सोडवणूक करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे माथाडी कामगार २६ फेब्रुवारीला लाक्षणिक संप करणार आहे.

राज्य सरकारकडे माथाडी कामगारांच्या न्याय प्रश्नांची अनेकदा निवेदन देऊनही त्यांची सोडवणूक करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येत्या बुधवारी २६ फेब्रुवारीला माथाडी कामगार लाक्षणिक संप करणार आहेत. या संपात सर्व माथाडी, व्यापारी, वाहतूक दार यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन चे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी केले आहे. पूर्वी माथाडी कामगाराला 10 तारखेला त्याचे वेतन मिळतं असे. मात्र, सद्यस्थितीत 15 ते 20 दिवस होऊनही वेतन माथाडी कामगारांच्या खात्यात येत नाही आहे. जुन्या संगणकिय नोंदीत कमीत कमी राज्यभरातील 2 लाख माथाडी कामगारांचा पगार वेळेत निघत असे. सद्यस्थितीत व्यापारी वर्गाकडून वेळेत पैसे दिले जातात, व डेटा एन्ट्री ही वेळेत केली जाते. मात्र, ती सिस्टीम सचिवांच्या व कामगार मंत्र्यांच्या माध्यमातून जाणूनबुजुन बदलली जात असल्याचा थेट आरोपही माथाडी नेत्यांनी केला आहे.
नवीन सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करत नसल्यानेही वेतन वेळेवर मिळत नाही. अतिरिक्त कामाचा भारही माथाडी कामगारांवरही येत आहे. याचबरोबर वारंवार मागणी करूनही इतर मागण्या पूर्ण होत नसल्याने कामगारांना लाक्षणिक संपाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बुधवारी दिनांक २६ फेब्रुवारी २०२०ला सर्व माथाडी कामगार लाक्षणिक संपावर जाणार आहेत. या संपात सहभागी होण्यासाठी माथाडी कामगार, वारणार, मापाडी कर्मचारी, कार्यालयिन सेवेतील कर्मचारी, पालावाला महिला कामगार, मेहता कर्मचारी, व अन्य घटकांनी संपूर्ण दिवस आपले काम बंद ठेऊन संपात सहभागी होऊन हा संप यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन चे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे.