ठाणे- गेल्या दोन आठवड्यापासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरमध्ये विनयभंग व अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे, आता महिलांसह लहान मुलींच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच बदलापुरात मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन भाचीवर अत्याचार; मामा गजाआड - बदलापूर पूर्व पोलिस
बदलापुरात मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.पीडित भाचीच्या तक्रारीवरून मामाला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे
ही घटना बदलापूर पूर्व परिसरातील एका कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी पीडित भाचीच्या तक्रारीवरून मामाला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नराधम चुलत मामा एका कॉलनीत राहतो. १६ वर्षीय अल्पवयीन पीडित भाची साडेबाराच्या सुमारास आपल्या आजीच्या घरातून तिचे कपडे आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित मुलीने हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. यानंतर मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बदलापूर पुर्व पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास स. पो. नि. एच. एम. कुलकर्णी करीत आहेत.