महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजी कापायच्या चाकूने मामाने केले भाच्याला जागीच ठार; आरोपी गजाआड - मामाने केले भाच्याला जागीच ठार

आरोपी सतिश हा देसले पाड्यातील विनायक कुंडल इमारतीत राहणारी बहिण सरीताकडेच राहतो. सरिताच्या घरात तिचा पती संजय , मुलगा यश , सरिताचे वडील आणि आरोपी सतीश असे एकत्र राहतात. कौटुंबिक वादातून ( Murder in family dispute ) सतीशने वडील आणि सरिताचा पती संजय यांच्याशी दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास घरातच अचानक भांडण झाले.

मामाने भाच्याला केले ठार
मामाने भाच्याला केले ठार

By

Published : Oct 25, 2022, 1:39 PM IST

ठाणे : घरातील कौटुंबिक वादातून मामानेच भाजी कापण्याच्या चाकूने भाच्यावर ( maternal uncle killed nephew ) सपासप वार करून घरातच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा परिसरात असलेल्या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ( Manpada police arrest uncle in murder ) ठाण्यात खुनी मामावर हत्येचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी ( Thane crime news ) त्याला बेड्या ठोकल्या आहे. सतिश राजनारायण दुबे (३१) असे अटक केलेल्या मामाचे नाव आहे. तर यश संजय तिवारी (२२) असे हत्या झालेल्या भाच्याचे नाव आहे.


भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करत असतानाच हत्या-आरोपी सतिश हा देसले पाड्यातील विनायक कुंडल इमारतीत राहणारी बहिण सरीताकडेच राहतो. सरिताच्या घरात तिचा पती संजय , मुलगा यश , सरिताचे वडील आणि आरोपी सतीश असे एकत्र राहतात. कौटुंबिक वादातून सतीशने वडील आणि सरिताचा पती संजय यांच्याशी दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास घरातच अचानक भांडण झाले. त्यावेळी आरोपी शिवीगाळ करुन तो भावजी संजय आणि वडिलांना मारहाण करण्यास धावत होता. हे पाहून घरातच असलेल्या भाचा यश हा भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करत असतानाच, आरोपी सतीशला यशचा राग आला. त्याच रागातुन आरोपी मामाने स्वयंपाक घरातील भाजी कापण्याच्या धारदार चाकूने यशवर सपासप वार केले. या चाकू हल्ल्यात यश गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.



आरोपी मामा पोलीस कोठडीत -त्यानंतर सरिताच्या नातेवाईकांनी मानपाडा पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत यशचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून आरोपी मामा ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून सतीशवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details