ठाणे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तब्बल ४ लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत काही उपक्रमांना संमती दिली. या माध्यमातून लॉकडाऊनमधील काही निर्बंध शिथील करण्यात आले. त्यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील जनजीवन पूर्ववत होताना दिसत आहे. मात्र, मिशन बिगिनच्या सुरुवातीलाच नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ठाणे टोल नाक्यावर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मिशन बिगिनला सुरुवात, जनजीवन पूर्वपदावर येताच मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी - massive traffic news
लॉकडाऊन नंतर आता अनलॉक सुरू झाले आहे. मात्र, सध्या लोकल सेवा बंद असल्याने चाकरमानी कामावर जाण्यासाठी बेस्ट आणि स्वतःची चारचाकी आणि दुचाकींचा वापर करत आहेत. त्यामुळे साहजिकच काही प्रमाणात रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे
लॉकडाऊन नंतर आता अनलॉक म्हणजेच राज्य सरकारचे मिशन बिगिन अगेन सुरू झाले आहे. मात्र, सध्या लोकल सेवा बंद असल्याने चाकरमानी कामावर जाण्यासाठी बेस्ट आणि स्वतःची चारचाकी आणि दुचाकींचा वापर करत आहेत. त्यामुळे साहजिकच काही प्रमाणात रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यातच इ-पास सेवा बंद केल्यामुळें जड अवजड वाहने देखील रस्त्यावर येत आहेत. परिणामी आज मुलुंड येथील टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.