ठाणे : भिवंडी ग्रामीण मधील गोदाम पट्ट्यासह शहरी भागातील लूम कारखान्यांना आगी लागण्याचे सत्र सुरु असून आज पुन्हा टिशू पेपरच्या गोदामाला भीषण आग ( fire broke out at tissue paper warehouse ) लागून अग्नितांडव घडले आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील दापोडा गावातील कृष्णा कॉम्प्लेक्स गोदाम संकुलात अरोनिया या कंपनीचे टिशू पेपरच्या गोदामात ( tissue paper warehouse in Bhivandi ) घडली असून भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र या आगीच्या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.
Thane Fire : भिवंडीत अग्नितांडव; टिशू पेपरच्या गोदामाला भीषण आग - भीषण आग भिवंडी
टिशू पेपरच्या गोदामाला भीषण आग ( fire broke out at tissue paper warehouse ) लागून अग्नितांडव घडले आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील दापोडा गावातील कृष्णा कॉम्प्लेक्स गोदाम संकुलात अरोनिया या कंपनीचे टिशू पेपरच्या ( tissue paper warehouse in Bhivandi ) गोदामात घडली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. या आगीत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.
टिशू पेपरच्या गोदामाला भीषण आग
आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न : साधारण आज १२ वाजल्याच्या सुमारास ही भीषण आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या आगीवर गेल्या साडे तासापासून नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु असल्याची माहिती देण्यात आली . ही आग आटोक्यात येण्यासाठी आणखी २ ते ३ तास लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या भीषण आगीत आतापर्यत लाखो रुपयांचे टिशू पेपरचे रोल जळून खाक झाले आहे. मात्र आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
Last Updated : Dec 24, 2022, 5:45 PM IST