महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Woman Dead Body in Sofa : विवाहितेची हत्या करून मृतदेह लपवला घरातील सोफ्यात; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

एका विवाहितेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घरातील सोफ्यात लपवून ( Woman Dead Body in Sofa )ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील दावडी गावातील ओम रेसिडन्सीमध्ये घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ( Manpada Police Station ) अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

married woman dead body found in sofa thane
विवाहितेची हत्या करून मृतदेह लपवला घरातील सोफ्यात

By

Published : Feb 16, 2022, 3:39 PM IST

ठाणे - एका विवाहितेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घरातील सोफ्यात लपवून ( Woman Dead Body in Sofa )ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील दावडी गावातील ओम रेसिडन्सीमध्ये घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ( Manpada Police Station ) अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुप्रिया शिंदे (वय ३३) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

शेजाऱ्यांना सोफ्याचा संशय आल्याने घटना उघडकीस -

मृत सुप्रियाचा पती किशोर शिंदे (वय ३८) हा मंगळवारी सकाळच्या सुमारास कामावर गेला होता. त्यावेळी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मात्र, संध्याकाळी पती किशोर हा कामावरुन घरी पसरला तेव्हा सुप्रिया घरात आढळून आली नव्हती. त्यामुळे तिचा शोध घेतला नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. अखेर काल रात्रीच्या सुमारास पती किशोर पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात गेला होता. याचदरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक शिंदे यांच्या घरी आले. त्यांना घरातील सोफा पाहुन संशय आला त्यांनी सोफा उघडून पहिला सोफ्यात सुप्रियाचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा -Actor Deep Sidhu Died In Accident : लाल किल्ला हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू

हत्येचे कारण अध्यापही गुलदस्त्यात -

सुप्रिया हिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणीसाठी रवाना करुन पोलिसांनी तपास सुरू केला. विशेष म्हणजे मानपाडा पोलिसांनी तासातच काही जणांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तर तिची हत्या का व कोणी केली? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details