ठाणे -लग्न झालेले असतानाही एका तरुणाने १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी दर्शन भेकरे या आरोपीला अटक केली आहे.
पीडित तरुणी ठाण्याच्या मानपाडा परिसरात राहते. काही महिन्यांपूर्वी कल्याण पूर्व चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दर्शन भेकरे याने पीडित तरुणीशी ओळख करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दर्शन याचे लग्न झालेले असतानाही त्याने पीडित तरुणीला लग्नासाठी वारंवार विचारणा केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून मेट्रो मॉल, गोव्यातील हॉटेल्स, बदलापूर पूर्व, मित्राच्या घरी, संगमेश्वर आणि रत्नागिरी अशा विविध ठिकाणी फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिच्यावर पाच महिने अत्याचार केला.