ठाणे - विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आणि आता सर्वांनाच दिवाळीच्या खरेदीसाठी चाहूल लागली आहे. पावसानेही उसंत दिल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठाही गजबजू लागली आहे. कापड खरेदीबरोबरच किराणा माल, फटाके, आकाश कंदीलांसह विद्युतरोषणाईसाठी दिव्यांच्या माळा, पणत्या, रांगोळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. तर, बोनसची रक्कम हाती आल्याने लोकांमध्ये खरेदीसाठी उत्साह आहे. नवी मुंबईत लोकांनी प्लास्टिकच्या कंदीलाला बगल देऊन कापडी कंदीलाचा पर्याय स्वीकारला आहे.
दिवाळीसाठी सजल्या बाजारपेठ ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत होते. दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली होती तरी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला होता. निवडणूक होऊन निकालही हाती आले आहेत. तसेच आत्ता दिवाळी सुरू झाल्याने खरेदीसाठी बाजारपेठही सज्ज झाल्या आहेत.
हेही वाचा -शतप्रतिशत भाजप; ठाणे जिल्ह्यात भाजपचा बोलबाला; १८ पैकी ९ जागेवर उमेदवार विजयी
दिवाळीसाठी किराणा माल घेण्याबरोबरच फराळाचे तयार पदार्थ घेण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे मिठाई दुकानदारांचीही तयारी जोरात सुरू आहे. बाजारपेठेत आकाश कंदील, विद्युतरोषणाईसाठी दिव्यांच्या माळांना मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्यात ग्राहकांकडून खरेदीसाठी विशेष प्रतिसाद मिळत नसल्याने व्यापारी चिंतेत होते. मात्र, आता बोनसची रक्कम हाती आल्याने नोकरदार वर्ग खरेदीसाठी बाहेर पडायला लागला आहे. पावसामुळे तसेच निवडणुकीचे वातावरण असल्याने सुरुवातीचे २ दिवस बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ नव्हती. मात्र, शुक्रवारी दिवाळीचा पहिला दिवस असून खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. दिवाळीनिमित्त स्वस्तात अगदी 100 ते 150 रूपयांत मिळणारे प्लास्टिकचे कंदील न घेता 200 ते 300 रुपयात मिळणाऱ्या कापडी कंदीलच्या खरेदीवर लोकं भर देत आहेत.
हेही वाचा -ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघातील मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीचा फायदा युतीला?