ठाणेMaratha Reservation:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला हिंसक वळण लागल्यानं मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरील रस्त्यावर 100 मीटरपर्यंत वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत आंदोलन सुरू असतानाच राज्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी आमदार, लोकप्रतिनिधींची निवासस्थानं, तसंच शासकीय कार्यालयांना लक्ष्य केल्यानं परिस्थिती चिघळू लागलीय. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. सोमवारपासून मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरील रस्त्यावर 100 मीटरपर्यंत वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय परिसरात साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.
रस्ता बंद केल्यामुळे स्थानिकांना समस्या :सुरक्षेचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील रस्ता ठाणे पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळं स्थानिकांना दूरवरून प्रवास करावा लागतोय. पोलिसांनी केलेल्या कृतीमुळं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केलीय.
आंदोलनाला लागलं हिंसक वळण : सोमवारी बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाला आंदोलकांनी आग लावली होती. यासोबतच राष्ट्रवादीचे कार्यालयही जाळण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांचे बंगले जाळण्यात आले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या गाड्याही जाळण्यात आल्या.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis : हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, आरक्षणासाठी सरकार सकारात्मक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Uddhav Thackeray On Maratha Reservation : संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा अन्यथा खासदारांनी राजीनामे द्या; उद्धव ठाकरे यांचं आवाहन
- Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीवरून आणखी एक आत्महत्या, मराठा समाज आक्रमक