ठाणे - मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. त्यामुळे, सोमवारी थेट मंत्रालयावर 'मराठा क्रांती ठोक मोर्चा' धडकणार असल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सोमवारी थेट मंत्रालयावर धडकणार 'मराठा क्रांती ठोक मोर्चा' - मराठा क्रांती ठोक मोर्चा
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. त्यामुळे, सोमवारी थेट मंत्रालयावर 'मराठा क्रांती ठोक मोर्चा' धडकणार असल्याची माहिती मोर्च्याचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरून हा मोर्चा निघणार आहे. तसेच, राज्यातील सर्व समन्वयक या मोर्चात सामील होणार आहेत. दोन दिवसात मराठा समाजाच्या प्रश्नांवर शासनाने तोडगा काढला नाही तर, राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारादेखील आबासाहेब पाटील यांनी यावेळी दिला.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आंदोलन काळातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, 2014 तील विद्यार्थ्यांच्या तत्काळ नियुक्त्या कराव्यात, 72 हजार मेगा भरती आणि MPSC तील विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात, शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ पीकविमा जमा करावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरूननरेंद्र पाटील यांना निलंबित करावे किंवा महामंडळ बरखास्त करावे, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.