ठाणे - मराठा विद्यार्थी वसतिगृहासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकार आणि पालिकेच्या विरोधात वसतिगृहाबाहेर उभे राहून आंदोलन केले गेले. गेल्या अनेक दिवसापासून मराठा विद्यार्थी वसतिगृहाची इमारत बनून तयार आहे. मात्र ही इमारत अजून राहण्यास पालिकेने खुली केली नाही.
ठाण्यात वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन - Thane maratha protest
महानगरपालिकेने सकल मराठा समाजाला वसतिगृह पाहणी करण्यास मज्जाव केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दरम्यान मराठा विद्यार्थी वसतिगृहाची वास्तू कधी खुली करणार, असा सवाल देखील त्यांनी केला. सरकारने आणि पालिका प्रशासनाने लवकरात लवकर मराठा विद्यार्थी वसतिगृहाची वास्तू राहण्यासाठी द्यावी, अशी मागणी आता सकल मराठा समाजाकडून होत आहे.

मराठा आंदोलन

याधी देखील ठाण्यात मराठा समजाने अनेकदा आंदोलन केले होते. वर्षभरापूर्वी मोठी तोडफोड देखील झाली होती.