ठाणे :सचिन वाझे, मनसुख हिरेन मृत्यू आणिउद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. अंबानींच्या घराबाहेरजिलेटीन कांड्या आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ सापडली होती. याप्रकरणी दाखल केसमध्ये हजर होण्याचा सल्ला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेने मनसुख हिरेन यांना वाझेच्या मुंबईतील कार्यालयात दिला होता. त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती लागले आहेत. यात हिरेनसोबत एक हॉटेल व्यावसायिक आणि एक पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे समोर आले आहे. एनआयएने त्या दोघांचेही जबाब नोंदविले आहेत.
गुन्हा कबुल न केल्याने हिरेनची हत्या ? -
अंबानींच्या घराबाहेर जिलेटीन कांड्या असलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या प्रकरणाचा तपास सचिन वाझेकडे सोपविण्यात आला होता. नंतर हे प्रकरण एसीपी अलखनुरे यांच्याकडे तपासण्यास दिले. त्यानंतर मनसुख हिरेन यांना सचिन वाझेने गुन्हा स्वतःवर घे असे सांगितले. मी तूला वाचवतो, अशी खात्रीही दिली होती. मात्र हिरेन यांनी गुन्हा स्वतःवर घेण्यास नकार दिला. त्यानंतर हिरेन यांचा जबाब अलखनुरे यांनी नोंदविला नाही. तो नोंदविल्यास सचिन वाझे फसणार होता. म्हणूनच मनसुख हिरेन यांची 4 मार्चला तावडे नावाच्या अधिकाऱ्याने बोलावून हत्या केली आणि त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत टाकला, अशी माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे.
गुन्हा कबुल कर म्हटल्याचे मनसुख यांनी पत्नीला सांगितले ? -
कदाचित हिरेन यांनी हा प्रकार 3 मार्चला रात्री आणि 4 मार्चला सकाळी आपली पत्नी विमला यांना सांगितलेला असावा. म्हणूनच हिरेन आणि त्यांचा भाऊ विनोद यांचे संभाषण या गोष्टीला पुष्टी देत आहे. काही केलेच नसल्याने गुन्हा का कबुल करावा? असा प्रश्न हिरेन यांना पडला असावा. यानंतर त्यांच्या हत्येचा कट शिजला असावा, अशीही माहती समोर येत आहे. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही.
मनसुख यांच्यासोबत दोन व्यक्ती कोण? -
त्या दिवशी मनसुख हिरेनसोबत होते दोघे; एक हॉटेल व्यावसायिक, दुसरा पोलीस कॉन्स्टेबल 3 मार्च रोजी मनसुख हिरेन हे सचिन वाझेला भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत दोन व्यक्ती असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यातील एक हॉटेल व्यावसायिक आणि दुसरा पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे समोर आले आहे. यानंतर एनआयएने दोघांचेही जबाब नोंदविले आहेत. शिवाय, त्याचवेळी वाझेने मनसुख यांना हजर होण्याचा सल्ला दिला. मात्र, मनसुख यांनी नकार दिला आणि अखेर 4 मार्चला रात्री उशीरा मनसुख हिरेन यांची हत्या केली, असेही समोर आले आहे. होळीच्या दिवशी एटीएस आणि एनआयएची बैठक -
होळीच्या दिवशी रविवारी एटीएस आणि एनआयएची बैठक झाली. एनआयए टीम ठाणे एटीएस कार्यालयात आली होती. प्रथम गुजरात राज्यातून आणलेली व्हॉल्वो कार आणली. ती एनआयए टीम घेऊन जाईल, असा अंदाज होता. पण एनआयए टीम गाडी न घेताच परत गेली. यापूर्वी व्हॉल्वो कार जप्त केल्यापासून फॉरेन्सिक लॅबमध्ये काही नमुने आणि सामान हस्तगत करण्यात आलेले आहे.
हेही वाचा -'..बस शर्त इतनी है कि, जमीन को नजरअंदाज ना करे' संजय राऊत यांच्या ट्विटने राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा -एनआयएकडून सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर केली तपासणी; सीपीयू आणि डीव्हीआर केला जप्त