ठाणे :डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान रेल्वे ग्राऊंडजवळ उघड्या कचराकुंडीत एका बॅगेमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळला. बॅगेत आढळलेला मृतदेह हा उमेश पाटील नावाच्या व्यक्तिचा आहे, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी सकाळी डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान उघड्या कचरा कुंडीत बेवारस बॅगेमध्ये मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत विष्णूनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी मृतदेह असलेली बॅग ताब्यात घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.