महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना अपडेट : लग्न सोहळा व हळदी सभारंभात कोरोनाचा फैलाव करणाऱ्या 'त्या' तरुणाला डिस्चार्ज - कोरोना प्रभाव

तुर्कीहून कल्याण पूर्वेत १५ मार्च रोजी हा तरुण आला होता. त्याला होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, होम क्वारंटाईन न राहता १८ आणि १९ मार्च रोजी डोंबिवलीतील एका लग्न आणि हळदीला हा तरुण उपस्थित राहिला होता. ज्यामुळे सभारंभाला उपस्थित असल्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता, मात्र कोरोना बाधित त्या तरुणाच्या २९ मार्च आणि १ एप्रिलला दोन चाचण्या झाल्या. त्या दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

लग्न सोहळा व हळदी सभारंभात कोरोनाचा फैलाव करणाऱ्या 'त्या' तरुणाला डिस्चार्ज
लग्न सोहळा व हळदी सभारंभात कोरोनाचा फैलाव करणाऱ्या 'त्या' तरुणाला डिस्चार्ज

By

Published : Apr 7, 2020, 10:33 AM IST

ठाणे - डोंबिवलीतील एका लग्न सोहळ्याला उपस्थित राहून कोरोनाचा फैलाव करणाऱ्या तुर्कीहून आलेल्या 'त्या' तरुणाला कस्तुरबा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, डिस्चार्जनंतरही या तरुणाला १९ एप्रिलपर्यंत सक्तीने घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

तुर्कीहून कल्याण पूर्वेत १५ मार्च रोजी हा तरुण आला होता. त्याला होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, होम क्वारंटाईन न राहता १८ आणि १९ मार्च रोजी डोंबिवलीतील एका लग्न आणि हळदीला हा तरुण उपस्थित राहिला होता. ज्यामुळे सभारंभाला उपस्थित असल्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता, मात्र कोरोना बाधित त्या तरुणाच्या २९ मार्च आणि १ एप्रिलला दोन चाचण्या झाल्या. त्या दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

तुर्कीहुन आलेला हा तरुण डोंबिवली पूर्वेकडील त्याच्या चुलत भावाच्या लग्न व हळदी समारंभाला उपस्थित होता. विशेष म्हणजे 14 मार्च रोजी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश पारित केले होते. या आदेशांचे उल्लंघन करून त्या कुटुंबाने लोकांना हळदी व लग्न समारंभासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे सरकारतर्फे रामनगर पोलिसांनी सदर कुटुंबीय आणि ग्राऊंडच्या मालकाविरोधात भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला.

तर, तुर्कीहून आलेला तरुण होम क्वारंटाईन असतानाही हळदी समारंभात हजर राहिला. त्याने सरकारने दिलेल्या आदेशांची अवहेलना करून कोरोना विषाणूचा संसर्ग पसरविण्याचा धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी संसर्गजन्य महामारी आजार प्रतिबंधक कायदा 1897 च्या कलम 2, 3, 4 सह भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, 271 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३४ वर पोहचला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उद्यापासून पुढील आदेश येईपर्यत सकाळी ६ ते संध्याकाळी ५ वाजपर्यंत खुली राहणार असल्याचे महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर, यामधून रुग्णालय व औषध विक्रीची दुकाने वगळ्यात आली असून हि सेवा सुरुच राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details