महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Man Smashed Head Of Woman : मांजर घरात आल्याच्या वादातून महिलेचे फोडले डोके; मांजरीच्या मालकांवर गुन्हा दाखल - मांजरीवरून वाद

मांजर घरात शिरल्याच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये जोरदार भांडण झाले (dispute over cat). या वादातून एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या महिलेला मारहाण (man beaten woman) केली. तसेच हातातील कड्याने तिच्या डोक्यावर वार करून डोकेही (man smashed head of woman) फोडले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात मांजरीचा मालक मुसबवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला. latest news from Thane, Thane crime

Man Smashed Head Of Woman
मांजर घरात आल्याच्या वादातून महिलेचे फोडले डोके

By

Published : Dec 2, 2022, 7:58 PM IST

ठाणे : शेजाऱ्याच्या घरात आरोपीचे मांजर गेल्याने यावरून दोघांमध्ये वाद (dispute over cat) झाला. हा वाद एवढ्या विकोपाला गेला कि, मांजराच्या मालकाने महिलेला बेदम मारहाण (man beaten woman) करत तिच्या डोक्यात हातातील स्टीलचे कडे मारून गंभीर जखमी केल्याची (man smashed head of woman) घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कोनगावातील सबेरा अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात मांजरीच्या मालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. latest news from Thane, Thane crime

मांजरावरून शेजाऱ्यांमध्ये वाद: मुसब (वय २५,) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर साबेरा इकबाल कच्छी ( वय ४०) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी मुसब हा भिवंडी तालुक्यातील कोनगावातील फाळके कॉलनीमधील सबेरा अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याच्याकडे पाळीव मांजर असून ही मांजर शेजारी राहणाऱ्या जलिना कच्छी यांच्या घरात काल दुपारी साडेबारा वाजल्याच्या सुमारास गेली होती. यावरून दोघात वाद झाला. त्यानंतर आरोपी मुसबने जलिना कच्छी यांची मुलगी समिनाशी मांजरी वरून पुन्हा वाद घातला. त्यामुळे तक्रारदार साबेरा यांनी आरोपी मुसबला मुलीशी वाद घातल्याचा जाब विचारला.

हातातील स्टीलचे कडे डोक्यावर मारले :याच गोष्टीचा राग येऊन आरोपीने तक्रारदार साबेरा यांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करत तिच्या डोक्यात हातातील स्टीलचे कडे मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात मांजरीचा मालक मुसबवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्ह्याचा अधिक तपास साहा. पोलीस निरीक्षक बोराटे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details