ठाणे : एका १९ वर्षीय तरुणीशी अश्लील संभाषण करत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या विकृत व्यक्तीला परिसरातील संतप्त महिलांनी चांगला चोप देत त्याची धिंड काढली. यानंतर आरोपीला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. कल्याण जवळील अटाळी भागात शनिवारी ही घटना घडली आहे. मात्र, आज या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तरुणीशी अश्लील संभाषण करणाऱ्या विकृताला चोप देत काढली धिंड; व्हिडीओ व्हायरल - THANE LATEST NEWS
दुपारच्या सुमारास आरोपीने त्याच्या ओळखीतल्याच तरुणीला ‘तुमच्या बिल्डींगमध्ये रूम खाली आहे का', अशी विचारणा करत गेल्या काही दिवसांपासून शरीरसुखाची मागणी केली. यामुळे भयभीत झालेल्या पीडित तरुणीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला.
धीरज राजपूत (५५) असे विकृत आरोपीचे नाव असून तो अटाळी परिसरात रहातो. २ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने त्याच्या ओळखीतल्याच तरुणीला ‘तुमच्या बिल्डींगमध्ये रूम खाली आहे का', अशी विचारणा करत गेल्या काही दिवसांपासून शरीरसुखाची मागणी केली. यामुळे भयभीत झालेल्या पीडित तरुणीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. हा प्रकार आजूबाजूच्या महिलांना समजताच संतप्त झालेल्या महिलांनी विकृत धीरजला चप्पल व खराट्याने बेदम चोप देऊन त्याची मोहने पोलीस चौकीपर्यत धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिक तपास ए.एस.आय. वांरगडे करत आहेत.