महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; पीडिता दोन वेळा गर्भवती

२९ वर्षीय पीडित तरुणी कल्याण-कसारा मार्गावरील अटाळी गावात राहते. पाच वर्षांपूर्वी तिची आरोपी हरिश्चंद्र याच्याशी ओळख झाली. त्यांनतर पीडितेला नोकरीची आवश्यकता असल्याचे पाहून तिला हाऊस किपींगची नोकरी मिळून देण्याच्या बहाण्याने जवळकी साधत प्रेमीच्या जाळ्यात अडकवले. काही दिवसानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या राहत्या घरातच बलात्कार केला.

पोलीस स्टेशन, police station
पोलीस स्टेशन

By

Published : Apr 23, 2021, 3:34 PM IST

ठाणे- हाऊस किपींगची नोकरी मिळून देण्याच्या बहाण्याने जवळकी साधत २९ वर्षीय पीडित तरुणीला प्रेमीच्या जाळ्यात अडकवले. त्यांनतर लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हरिश्चंद्र गभाले (रा. कल्याण तालुका, म्हारळगाव) असे आरोपीचे नाव आहे.

पीडितेचे पैसेही लांबवले -

२९ वर्षीय पीडित तरुणी कल्याण-कसारा मार्गावरील अटाळी गावात राहते. पाच वर्षांपूर्वी तिची आरोपी हरिश्चंद्र याच्याशी ओळख झाली. त्यांनतर पीडितेला नोकरीची आवश्यकता असल्याचे पाहून तिला हाऊस किपींगची नोकरी मिळून देण्याच्या बहाण्याने जवळकी साधत प्रेमीच्या जाळ्यात अडकवले. काही दिवसानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या राहत्या घरातच बलात्कार केला. मात्र, वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे पीडित गर्भवती राहिली होती. त्यातच पीडितेचे वडिलोपार्जित घराची विक्री करून त्यातून मिळाली रक्कमही आरोपी हरिश्चंद्रने बहाण्याने पीडितेकडून हडप केली.

वारंवार अत्याचारामुळे पीडिता दोन वेळा गर्भवती -

लग्नाचे आमिष दाखूवन आरोपीने पीडितेवर तिच्या राहत्या घरात वारंवार ऑगस्ट २०१६ पासून मार्च २०१२पर्यंत अत्याचार केल्याने पीडिता दोन वेळा गर्भवती राहिली. मात्र, आरोपीने मारहाण व धमकी देत तिचा दोन्ही वेळा जबरदस्तीने गर्भपात केला. मात्र, गेल्या काही दिवसापासून आरोपीकडे पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता. ‘तुला काय करायचे ते कर मी तुझ्याशी लग्न करणार नाही,’ अशी धमकी दिल्याने पीडितेने आरोपी विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी आरोपीवर भादवी कलम ३७६, ४२०, ४०६, ३१३, ५०६प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. केदार करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details