महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधमाला बेड्या - rape news thane

15 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीवर वारंवार नराधम नातेवाईक शांताराम याने बलात्कार केला. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे तिला कल्याण रेल्वे स्थानकावर सोडून नराधम नातेवाईक पळून गेला. चार महिन्यांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पीडित अल्पवयीन मुलगी अस्ताव्यस्त अवस्थेत पोलिसांना आढळून आली होती.

गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्का

By

Published : Oct 3, 2019, 11:23 PM IST

ठाणे- १५ वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन गरोदर अवस्थेत एका नराधमाने आपला गुन्हा लपवण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात ४ महिन्यापूर्वी पीडितेला आणून सोडले होते. विशेष बाब म्हणजे पोलिसांनी नराधमाच्या आडनावाचा आधारे त्याला जळगाव जिल्ह्यातील एका गावातून बेड्या ठोकल्या आहे. शांताराम हटकर (३२) असे नराधमाचे नाव असून तो पीडित मुलाचा नातेवाईक असून त्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे.

गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार

हेही वाचा-पुण्यात चंद्रकांत पाटीलांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

नराधम नातेवाईक शांताराम याने 15 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीवर वारंवार बलात्कार केला. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे तिला कल्याण रेल्वे स्थानकावर सोडून नराधम नातेवाईक पळून गेला. खळबळजनक बाब म्हणजे चार महिन्यांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पीडित अल्पवयीन मुलगी अस्ताव्यस्त अवस्थेत पोलिसांना आढळून आली होती. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, पीडित मुलगी गतिमंद असल्याने ती फक्त आपले नाव आणि आडनाव सांगत होती. तर उपचारादरम्यान पीडित मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

हेही वाचा-पाहा तारा सुतारिया; सिद्धार्थ मल्होत्राची रोमॅन्टिक केमेस्ट्री, 'मरजावां'चं गाणं प्रदर्शित

घटेनचे गांभीर्य ओळखून कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी आरोपीचे नाव, आडनाव आणि जिल्हा जळगाव या तीन शब्दांच्या आधारावर आपला तपास सुरू केला. त्यातच पीडित मुलगी तीन आडनाव पोलिसांना सांगत होती. त्या आडनावाची मुले जळगाव जिल्ह्यातील विविध 30 गावात राहतात. हे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील ३० गावे गाठत या सर्व गावात तपास केला. अखेर महात्मा फुले पोलिसांनी मतदार यादीत आरोपीचे नाव शोधले. मात्र, त्यांना आढळून आले नाही. अखेर आधारकार्ड व अडनावच्या आधारावर पोलीस नराधमपर्यत पोचले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने पीडित गतिमंद मुलीवर अनेक महिन्यापासून बलात्कार करुन तिला गर्भवती असताना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सोडल्याची पोलिसांना कबुली दिली. पोलिसांनी नराधम शांताराम हटकरवर बलात्कार, पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details