ठाणे - गुलाबजामूनची विक्री करून घरी परतणाऱ्या विक्रेत्याला भरधाव कारने चिरडल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. अपघातात राजू डेमला (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजू हे शहरातील श्रीराम चौकाकडून व्ही.टी.सी मैदानाकडे पायी जात असाताना ही घटना घडली.
भरधाव कारने गुलाबजामून विक्रेत्याला चिरडले; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद - उल्हासनगर अपघात सीसीटीव्हीत कैद
राजू गुलाबजामून विक्री केल्यानंतर शनिवारी रात्री सव्वा ११ च्या सुमारास हातगाडी घेऊन श्रीराम चौकाकडून व्ही.टी.सी मैदानाकडे जात होते. यावेळी, श्रीराम चौकाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने राजू यांना जोरदार धडक दिली. या घटनेत राजू यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
![भरधाव कारने गुलाबजामून विक्रेत्याला चिरडले; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद मृत राजू डेमला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5688528-184-5688528-1578840629280.jpg)
हेही वाचा -धक्कादायक....बॅगचा बेल्ट स्कुलबसच्या दारात अडकल्याने विद्यार्थी आला चाकाखाली
राजू गुलाबजामून विक्री केल्यानंतर शनिवारी रात्री सव्वा ११ च्या सुमारास हातगाडी घेऊन श्रीराम चौकाकडून व्ही.टी.सी मैदानाकडे जात होते. यावेळी, श्रीराम चौकाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने राजू यांना जोरदार धडक दिली. या घटनेत राजू यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी, अज्ञात कारचालकाविरूध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहोय्यक पोलीस उपनिरिक्षक ठाकरे करत आहेत.