ठाणे - उल्हासनगरमध्ये एका निर्दयी तरुणाने भल्यामोठ्या सापाला आपटून ठार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहून एका सर्पमित्राने त्या निर्दयी तरुणावर कारवाईच्या मागणीसाठी बदलापूर वन विभागाकडे तक्रार केली होती. सर्पमित्राच्या तक्रारीवरून वनाधिकार्यांनीही पोलिसांच्या मदतीने त्या तरूणाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. आफताब अन्सारी असे अटक केलेल्या निर्दयी तरुणाचे नाव आहे. तो उल्हासनगरमधील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
सापाला आपटून ठार मारणाऱ्या तरुणाला पोलीस कोठडी; सर्पमित्रांकडून कठोर कारवाईची मागणी - aftab ansari
आफताब अन्सारी नावाच्या तरूणाने धोबीघाट परिसरात एका 8 ते 9 फुटच्या सापाला पकडून त्याला जंगलात न सोडता जमिनीवर आपटून मारून टाकले. या घटनेचा व्हिडीओ तीन दिवसापीसून सोशल मीडियावर वायरल होत होता. सर्पमित्र चेतन गुडे व्हायरल व्हिडिओ पाहताच या प्रकरणाची तक्रार बदलापूर वन विभाग अधिकाऱ्याकडे केली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आफताबचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक करून पोलीस कोठडीत डांबले आहे.
आफताब याने धोबीघाट परिसरात एका 8 ते 9 फुटच्या सापाला पकडले. यानंतर त्याने सापाला पकडून जंगलात सोडणे अपेक्षित होते. मात्र या निर्दयी तरुणाने त्या सापाला जोरात जमिनीवर आपटून ठार मारले. त्यावेळी कुणी तरी या घटनेचे चित्रीकरण करून गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हा व्हायरल व्हिडिओ सर्पमित्र चेतन गुडे यांनी पाहताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार बदलापूर वन विभाग अधिकाऱ्याकडे केली. त्यांच्या तक्रारीवरून बदलापूर वन विभाग अधिकाऱ्यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापाला मारताना व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या आफताबचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करून पोलीस कोठडीत टाकण्यात आले आहे.
तर दुसरीकडे हा व्हिडिओ पाहून जिल्ह्यातील सर्व सर्पमित्रांनी या निर्दयी तरुणावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.