महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत कोविडची दुसरी लस घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू ? - भिवंडी कोरोना बातमी

ठाण्याच्या भिवंडी येथे कोरोनाची दुसरी लस घेणाऱ्या व्यक्तीला चक्कर आल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यास डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, अशी प्रतिक्रिया भिवंडी पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी दिली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Mar 2, 2021, 8:41 PM IST

Updated : Mar 2, 2021, 8:47 PM IST

ठाणे - कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून देशभर नागरिकांना कोरोनापासून बचाव करणाऱ्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या व्यक्तीला लसीकरण केंद्रातच चक्कर आली. त्यानंतर त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना भिवंडीतील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रात मंगळवारी (दि. 2 मार्च) घडली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

भिवंडीत कोविडची दुसरी लस घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू ?

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अजूनही समजले नसल्याने आरोग्य विभागातही मोठी खळबळ उडाली आहे. सुखदेव किर्दत (वय 45 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते ठाणे येथील मनोरमा नगर येथील रहिवासी असून भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहन चालक म्हणून काम करत होते.

शवविच्छदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण येणार समोर

मृत सुखदेव हे मंगळवारी सकाळी 11 वाजल्याच्या सुमाराला कोविड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी भिवंडी शहरातील भाग्यनगर येथील कोवीड लसीकरण केंद्रात गेले होते. त्यावेळी त्यांनी दुसरा डोस घेतल्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षा गृहात थांबले होते. मात्र, त्यानंतर सुमारे पंधरा मिनिटांनी त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले त्यांना उपचारासाठी भिवंडीतील स्व. इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता येथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लस घेतल्यानंतर सुखदेवचा मृत्यू नेमकी कोणत्या कारणाने झाला ? याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर माहिती मिळेल. त्यासाठी ठाणे आरोग्य विभागाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक देखील भिवंडीत दाखल झाले असून शवविच्छदन अहवालानंतरच नेमकी कारण समजेल, अशी प्रतिक्रिया भिवंडी पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी दिली आहे.

कोविडची लस घेण्याअगोदर सर्व तपासणीत होते व्यवस्थित

मृत सुखदेव हे सकाळी 11 वाजता लसीकरण केंद्रात आले. त्यांचा रुग्ण इतिहास व इतर वैद्यकीय बाबींची चौकशी व तपासणी केली असता सर्व व्यवस्थित होते. त्यानंतरच त्यांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. त्यांच्या अगोदर इतर सात जणांना देखील डोस देण्यात आले होते. ते सर्व व्यवस्थित असून निरिक्षण कक्षात किर्दत बसले असता त्यांना चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले, अशी माहिती लसीकरण केंद्रात कर्तव्यावर असलेल्या सुगंधा कांबळे, समिधा पाईकराव, पूनम ठाकरे या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

चौकशी व्हावी अन् न्याय मिळावा

या घटनेची सखोल चौकशी व्हावी व मला न्याय मिळावा, अशी प्रतिक्रिया मृत सुखदेव किर्दत यांची पत्नी सोनाली किर्दत यांनी दिली आहे.

हेही वाचा -सत्ताधारी भाजपला सुप्रीम कोर्टाची चपराक; स्वीकृत निवडीला स्थगिती

Last Updated : Mar 2, 2021, 8:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details