ठाणे :कल्याण शहरात एक 37 वर्षीय व्यक्तीची 44 लाख रुपयांची फसवणूक करण्यात ( Man Loses 44 Lakh In Cyber Fraud ) आली. आरोपीने मेसेजिंग अॅपद्वारे गेमिंग पोर्टलची लिंक फॉरवर्ड केली. त्यात वेळोवेळी गेम अपडेट करण्यात येत ( Forward Link Through Messaging App ) आहेत. त्यासाठी पैशांची गरज आहे असे भासवून मदत करण्यास सांगितले. अशा प्रकारे फसवणूक करण्यात आली.
Cyber Fraud : सायबर फसवणूकीतून एका व्यक्तीची सुमारे 44 लाखांची फसवणूक - Forward Link Through Messaging App
ठाण्यात 37 वर्षीय व्यक्तींची 44 लाखांची फसवणूक करण्यात ( Man Loses 44 Lakh In Cyber Fraud ) आली. त्याविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्ह्या नोंदवण्यात आला आहे. आरोपीने 24 नोव्हेंबरपासून अनेक वेळा पैसे मागितले होते.
![Cyber Fraud : सायबर फसवणूकीतून एका व्यक्तीची सुमारे 44 लाखांची फसवणूक Cyber Fraud](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17225102-thumbnail-3x2-dvdfb.jpg)
44 लाख रुपयांचे नुकसान :अज्ञात व्यक्तीने पैसे देण्याचे आमिष दाखवून आपले सुमारे 44 लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेमिंग ऍप्लिकेशन वापरल्याबद्दल कमिशन मागत ही रक्कम हडप करण्यात आली. असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. भारतीय दंड संहिता 420 (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पीडित व्यक्तीने 24 नोव्हेंबरपासून अनेक वेळा अज्ञात आरोपींना पैसे दिले.
चांगले कमिशन मिळेल : "आरोपींनी मेसेजिंग अॅपद्वारे गेमिंग पोर्टलची लिंक फॉरवर्ड केली आणि पीडितेला लॉग इन करण्यास सांगितले. त्याने पीडितेला सांगितले की गेमची काही कामे पूर्ण केल्यानंतर, त्याला चांगले कमिशन मिळेल," असे पोलीस अधिकाऱ्याने ( Lure of good commission ) सांगितले. "त्यानंतर, आरोपींनी पीडितेकडे वेगवेगळ्या वेळी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. तथापि, पीडितेला नंतर कळले की आपल्याला त्याचे पैसे परत किंवा कमिशन मिळणार नाही. आपली फसवणूक झाली आहे. त्यावेळी स्थानिक पोलीस स्थानकात गुन्ह्या नोंदवण्यात आला.