महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकतर्फी प्रेमातून विधवा महिलेवर हल्ला; भर रस्त्यात केले विळ्याने वार - विधवा महिलेवर हल्ला

या जीवघेण्या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विकृत प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. बाबासाहेब पगारे (वय 38) असे आरोपीचे नाव आहे.

thane police
ठाणे पोलीस स्टेशन

By

Published : Aug 24, 2020, 12:56 AM IST

ठाणे : एका 40 वर्षीय विधवा महिलेवर एकतर्फी प्रेमातून एका व्यक्तीने भर रस्त्यात विळ्याने सपासप वार करत हल्ला केला. या व्यक्तीने महिलेकडे मागील काही दिवसांपासून लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, लग्नास नकार मिळत असल्याने संतप्त होऊन त्याने धारदार गवत कापण्याच्या विळ्याने त्या महिलेवर हल्ला केला.


या जीवघेण्या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विकृत प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. बाबासाहेब पगारे (वय 38) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील चोपडा कोर्ट परिसरात 40 वर्षीय विधवा महिला तिच्या दोन मुलांसह राहते. उदरनिर्वाहासाठी ती कल्याणातील एका हॉटेलमध्ये केटरिंगचे काम करते. तर आरोपी हा उल्हासनगर तीन येथील शांतीनगर परिसरात राहणारा असून त्याची गेल्या काही वर्षांपासून त्या विधवा महिला सोबत ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपी बाबासाहेब हा महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, तिच्या पहिल्या पतीपासून झालेली मुले आता मोठी झाली असल्याचे कारण देऊन ती लग्न करण्यास त्याला नकार देत होती. त्यामुळे आरोपी बाबासाहेब हा तिच्यावर संताप व्यक्त करत होता.

काल(रविवार) दुपारच्या सुमारास महिला शांतीनगर परिसरातून कामाला जात असताना आरोपीने तिला भर रस्त्यात गाठले. अन् पुन्हा लग्नाचा विषय काढला. मात्र, तिने पुन्हा नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपी बाबासाहेब याने धारदार विळ्याने तिच्या मानेवर, छातीवर, पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी बाबासाहेब यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आंबेकर करीत आहेत. दरम्यान, एका प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने तिच्या प्रियकराने झाडाला लटकवून तिची हत्या केल्याची घटना कल्याण भिवंडी रोडवरील टाटा आमंत्रा या गृह संकलनाच्या पाठीमागील खदानीत घडली होती. ही घटना ताजी असतानाच आठवड्याभरातच याच पद्धतीची दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details