महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर नराधमाचे केला अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी

घराशेजारी राहणाऱ्या 11 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या 45 वर्षीय नराधमाने घरात नेऊन तिच्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नारपोली पोलीस ठाणे
नारपोली पोलीस ठाणे

By

Published : Jul 7, 2021, 10:25 PM IST

ठाणे - घराशेजारी राहणाऱ्या 11 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या 45 वर्षीय नराधमाने घरात नेऊन तिच्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारधर्माला काळीमा फासणारी ही घटना भिवंडीत घडली आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नराधमावर अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेश गुप्ता, असे नरधमाचे नाव आहे.

लाकडी दांडक्याने पीडितेच्या आईवरही हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह राहते. सोमवारी (दि. 5 जुलै) पीडित मुलगी आपल्या घरासोमर खेळत होती. त्यावेळी शेजारी राहणारा नराधम राजेशने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला त्याच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने भयभीत झालेली पीडिता घरी रडत गेल्यानंतर तिच्या आईने तिच्याकडे चौकशी केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनतर पीडित मुलीच्या आईने नराधमाच्या घरी जाऊन त्याला घटनेचा जाब विचारला असता, त्याने लाकडी दांडक्याने पीडित मुलीच्या आईवर हल्ला करून तिलाही गंभीर जखमी केले.

नराधमाला पोलीस कोठडी

पीडितेच्या आईने पीडित मुलीला घेऊन नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी भा.दं.वि.चे कलम 376, 324, सह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून नराधमाला काही तासातच अटक केली. नराधमास न्यायालयात हजर केले असता 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास नरपोली पोलीस करीत आहेत.

हेही वाचा -MODI Cabinet Expansion : खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी.. जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details