महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत एक दिवसाच्या कुपोषित बाळाचा मृत्यू; सरकारी आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे - bhiwandi kamatghar

गरोदर महिलेने नऊ महिने पूर्ण झालेल्या बाळाला रुग्णालयात जन्म दिला. मात्र, ते बाळ कुपोषित जन्माला आल्याने दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील कामतघर परिसरात घडली आहे. या घटनेने शासकीय आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे.

ठाणे

By

Published : Apr 6, 2019, 10:00 PM IST

ठाणे- गरोदर महिलेने नऊ महिने पूर्ण झालेल्या बाळाला रुग्णालयात जन्म दिला. मात्र, ते बाळ कुपोषित जन्माला आल्याने दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील कामतघर परिसरात घडली आहे. या घटनेने शासकीय आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे.

अर्चना प्रमोद बोल्ली (वय २५ रा. ताडाळी रोड, कामतघर) असे बाळाला जन्म देणाऱ्या मातेचे नाव असून तिने शुक्रवारी कळव्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता. मात्र, दुर्दैवाने ते बाळ कुपोषित जन्माला आल्याने त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. राज्य सरकार कुपोषण टाळण्यासाठी गरोदर मातांना विविध योजनांद्वारे आहार पुरवत आहे. मात्र, या दुर्दैवी मातेला गरोदरपणात योग्य आहार मिळू न शकल्याने तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची शासनाच्या आरोग्य विभागाने योग्य ती दखल घेऊन या घटनेस जबाबदार असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details