ठाणे -दलित पँथर ( Dalit Panther ) फोडण्याचे काम भाजपाने ( BJP ) केले आहे. प्रचंड ताकद एकत्र येणे सनातन वादाच्या दृष्टिकोनातून घातक गोष्ट आहे. त्यांना आपण एकत्र येणे हेच नको आहे. दलित जनता एकत्र न येण्याचे काम भाजपा करत आहे. दलित शक्तीला एकत्र येण्यासाठी भाजपा हा पक्ष रोखत आहे, असे आरोप मल्लिका ढसाळ ( Mallika Dhasal ) यांनी केला आहे. तर दलित समाज अनेक गटा तटात विखूरला गेला आहे. सगळ्यांनाच नेते व्हायचे आहे. सगळ्यांनाच चमकोगिरी करायची आहे. नेते पदाधिकारी इगोत अडकले आहेत, अशी खंतही दलित पँथरच्या मल्लिका ढसाळ यांनी व्यक्त केली. राज्यस्तरीय कार्यकर्ता बैठकीत ( State Level Worker Meeting ) त्या ठाणे येथे बोलत होत्या.
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका बघता आता पुन्हा नव्याने दलित पँथर संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर संघटना मोठ्या ताकतीने वाढवणार आहे. लोकांच्या हिताचे काम करणार असल्याचे नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथर संघटनेच्या मल्लिका ढसाळ व नव्याने झालेले राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच यावेळी सत्ताधारी पक्षावर देखील निशाणा साधला.
'भाजपा दलितांना एकत्र येण्यापासून रोखत आहे'