ठाणे - दोन दिवसांपूर्वी घर काम करण्यासाठी ठेवलेल्या मोलकरणीने घरातील वयोवृद्ध महिलेवर थेट जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने घेऊन पळ काढण्याची खळबळजनक घटना उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात त्या हल्लेखोर लुटारू मोलकरणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तिचा शोध घेत आहे.
मोलकरणीचा वृद्ध महिलेवर हल्ला; दागिने घेऊन पसार - crime
दोन दिवसांपूर्वी घर काम करण्यासाठी ठेवलेल्या मोलकरणीने घरातील वयोवृद्ध महिलेवर थेट जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने घेऊन पळ काढण्याची खळबळजनक घटना घडली.
उल्हासनगर शहरातील कॅम्प १ येथील कमला नेहरूनगर धोबीघाट परिसरात छबूबाई गर्जे ही वयोवृद्ध महिला राहते. ती घरात एकटीच राहत असल्याने तिने एका तरुणीला घरकामाला ठेवले होते. तसेच तिला घरीच राहण्यास सांगितले होते. काल (रविवारी) रात्री ११ च्या सुमारास कामावर ठेवलेल्या त्या तरुणीने वयोवृद्ध छबूबाई हिच्या डोक्यात लाकडी लाटणे मारून तिच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची चैन जबरीने हिसकावून ती पसार झाली आहे. मोलकरणीने केलेल्या हल्ल्यात छबूबाई या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कल्याण येथील फ्रोटीज रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहे.
हेही वाचा - डोंबिवलीत 'केमिकल लोचा', तेलाचा पाऊस पडल्याची दिवसभर अफवा