ठाणे Mahesh Tapase Criticized BJP: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संपताची लाट पसरलीय. आमदार पडळकर यांच्या विरोधात राज्यभर निषेध नोंदवून विविध मार्गाने आंदोलन करण्यात आली, असं असताना या वादात (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उडी घेतलीय. आमदार पडळकरांच्या विधानाचा राग धरून अजित पवारांनी मुंबईतील अमित शाहंच्या बैठकीला जाणं टाळलं, असा दावा त्यांनी केलाय. शिवाय अजित पवार आणि भाजपामध्ये कसे राजकीय मतभेद आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलंय.
नव्यानं मुख्यमंत्री निवडण्याची वेळ : महेश तपासे पुढे म्हणाले की, सध्याचे तीन पक्षाच्या विद्यमान सरकारमध्ये कोणाचा कोणाबरोबर ताळमेळ नाही. त्यामुळं आज ना उद्या 16 आमदार बरखास्त होणार आहेत. ज्यामध्ये शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. असं घडलं, तर राज्यातील मंत्रीमंडळ बरखास्त करून नव्यानं मुख्यमंत्री निवडण्याची वेळ येईल. तर कामगारांना चांगले दिवस आले की, उद्योगपतीना तो येणारा काळ ठरवेल. सध्या देशात 40 टक्के सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारी आहे. त्यामुळं तरुणांचं लग्नाचं वय निघून जातं, तरीही त्याला नोकरी अथवा रोजगार मिळत नाही, हे भाजपा सरकारचं अपयश असल्याची टीका महेश तपासे यांनी केली.
Mahesh Tapase Criticized BJP : ‘म्हणून’ अजित पवारांनी अमित शाहंच्या बैठकीला जाणं टाळलं- महेश तपासे यांचा दावा - अजित पवार
Mahesh Tapase Criticized BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते (शरद पवार गट) महेश तपासे हे भिवंडीत पक्षातील कार्यकर्त्याच्या भेटीसाठी आले होते. आमदार पडळकरांच्या विधानानंतर भाजपा नेत्यांना अजित पवारांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली, असं महेश तपासे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय. ते भिवंडीत पक्षाच्या कार्यकत्याच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील इतरही राजकीय घडामोडीवर भाष्य केलंय.
Published : Sep 27, 2023, 8:10 PM IST
चौथ्या स्तंभाला बिघडवण्याचं काम : तसंच चौथ्या स्तंभाला बिघडवण्याचं काम भाजपा करतंय, अशी बोचरी टीकाही त्यांनी केलीय. तपासे म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे विरोधात बातमी येऊ नये म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्यास सांगतात. खरंतर 9 वर्षात भाजपा सरकार अपयशी झाल्यानं त्यांच्यावर ही वेळ आलीय. त्यामुळं बावनकुळे यांनी आपले वक्तव्य मागे घेत पत्रकारांची माफी मागितली पाहिजे, असंही तपासे म्हटले आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना 33 टक्के आरक्षण देऊ ही घोषणा फक्त जुमलेबाजी आहे. आरक्षण कधी, तर जनगनणा झाल्यावर लागू करू. परंतू कोणताही निश्चित वेळ नाही. त्यामुळं ही फक्त जुमलेबाजी असल्याचं मत तपासे यांनी व्यक्त केलंय.
आरक्षणाच्या नावाने खेळ :तपासे पुढे म्हणाले की, भाजपाचा आरक्षणाच्या नावानं निवणुकीच्या आधी खेळी व भावनिक उद्रेक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय. हे सरकार फसवं असल्यानं लोकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. तसंच मुंबईत पाणी तुंबलं की उद्धव ठाकरेंवर टीका करायची अन दुसरीकडे चार तासांच्या पावसात स्मार्ट सिटी नागपूर शहर पाण्याखाली गेलंय. त्यामुळं जे भाजपा नेते नागपूर शहराच्या विकासासाठी बड्याबड्या बाता मारत होते, ते सर्व दावे फोल ठरले आहेत. एकीकडे मुंबई पाण्याखाली गेली तर तत्कालीन प्रशासन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोष द्यायचा, जर नागपूर पाण्याखाली गेलं तर तोच दोष निसर्गाला द्यायचा, अशी दुटोकी भावना भाजप सरकारची आहे, असा टोमणा तपासे यांनी भाजपा नेत्यांना लगावलाय.
हेही वाचा :