महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahesh Tapase On Gas Cylinder Price Hike : 'तुम तो हर मिसाल बेमिसाल करते हो’; गॅस दरवाढीवरून महेश तपासेंचा सरकारला टोला - अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनीही गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने मोदी सरकारवर टिका केली आहे. त्यांनी अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको, तुम तो हर मिसाल बेमिसाल करते हो असे म्हणत टोला लगावला आहे. देशभरातून या दरवाढीवर टीका केली जात आहे.

Mahesh Tapase On Gas Cylinder Price Hike
गॅस दरवाढीवरून महेश तपासेंचा सरकारला टोला

By

Published : Mar 1, 2023, 4:00 PM IST

गॅस दरवाढीवरून महेश तपासेंचा सरकारला टोला

ठाणे :गेल्या वर्षात चारवेळा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असतानाच, याही वर्षी होळीच्या पूर्वीच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती ५० रुपयाने वाढ झाली आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू झाल्याने सर्वच विरोधी पक्षांनी मोदींवर सरकारवर गॅस दरवाढीवरून टीकेची झोड उठवली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनीही अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको, तुम तो हर मिसाल बेमिसाल करते हो, या गालिबच्या शायरीतुन मोदी सरकारवर निशाणा साधत गॅस दरवाढीवर टीका केली आहे.


देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली :तपासे पुढे म्हणले कि, घरगुतीसह वाणिज्य वापरातही गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे टपरीवर मिळणाऱ्या चहाचा दर दुप्पट होणार आहे. तर हॉटेलमधील खाद्यपदार्थावरील दरही सर्वसामान्य नागरिकांच्या अवाक्या बाहेर गेला आहेत. दुसरीकडे देशाचा विकास दर गेल्या वर्षाच्या तुलनेत आणखी कमी झाल्याने देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. मात्र यावर केंद्रातील मोदी सरकार काहीच बोलत नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गॅस दरवाढीचा निषेध करत मोदी सरकारवर टीका केली.


हजारो महिला पुन्हा चुलीकडे वळल्या :देशभरात सन २०१९पासून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना शहरी भागात कमी तर आदिवासी ग्रामीण भागातील महिलांचा त्रास कमी व्हावा धुरा पासून सुटका मिळावी म्हणून लाभदायवक ठरली होती. मात्र या योजनेची दिवसेंदिवस होणारी दरवाढ आता हजार पार करून गेली आहे. मिळणारी सबसिडी गायब झाल्याने, जिल्ह्यातील उज्वला धारक महिलांना पुन्हा लाकूड फाट्याचा आधार घेत, चुली पुन्हा पेटवावी लागत आहेत. या योजनचा ग्रामीण आदिवासी भागात मात्र फोल ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ३५० रुपयात घरगुती वापरायला मिळणारा गॅस आता अकराशेच्या पार पोहोचल्याने ग्रामीण भागातील महिलांना तो परवडे नासा झाला आहे. त्यामूळे उज्वला योजनेअंतर्गत १०० रुपयात मिळालेला गॅस आता अडगळीत टाकून वाड्या पाड्यावरील हजारो महिला पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत.



भाव वाढवून सबसिडी घटविली : ग्रामीण भागातील आदिवासी महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्तता व्हावी या उद्देशाने प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना केवळ शंभर रुपयात गॅस कनेक्शन देऊन दिलासा मिळाला. त्यामुळे महिलांमध्ये समाधान निर्माण झाले होते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील हजारो महिलांना हा गॅस मिळाला आहे. परंतु गॅसच्या वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडले आहे. जसजशी गॅसची दरवाढ होत गेली तसतशी मिळणारी सबसिडी देखील कमी होत गेली सातशे रूपयात गॅस सिलेंडर मिळत होता. त्यावर तीनशे रूपये सबसिडी मिळत होती. आता गॅसचा दर अकराशे रुपयांच्या घरात गेल्यानंतर सबसिडी दहा रूपयावर आली.

हेही वाचा :Maharashtra Budget Session 2023 : संजय राऊत अडचणीत.. विधानसभेत हक्कभंगाचा अर्ज, कामकाज तहकूब

ABOUT THE AUTHOR

...view details