महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Municipal Election: ठाण्यात महाविकास आघाडी झालीच पाहिजे - प्रवीण दरेकर

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Thane Municipal Election) भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. भविष्यात देखील असेच प्रवेश सुरू राहणार आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही झालीच पाहिजे कारण तिकीट न मिळालेले इच्छुक असलेले चांगले काम करणारे कार्यकर्ते भाजपला मिळणार आहेत असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Leader of Opposition Praveen Darekar) यांनी व्यक्त केले आहे.

Wagh / Darekar
वाघ/दरेकर

By

Published : Feb 22, 2022, 4:33 PM IST

ठाणे:ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी झाल्यास प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला डावलले जाईल, नेत्याच्या घरात तिकीट दिले जाईल, त्यामुळे नाराज उमेदवाराची आम्ही नक्कीच दखल घेऊ. ठाण्याच्या भीमनगर येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ, ठाणे शहर भाजप अध्यक्ष निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

वाघ/दरेकर

गाडी फुल्ल होण्याच्या आधी या
पालिका निवडणूकच्या तोंडावर भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत आहे. दोन दिवसांपूर्वी वागळे इस्टेट मधील शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने सेनेच्या बालेकिल्ल्यात खिंडार पडल्याचे चित्र पहायला मिळाले होते. सोमवारी वर्तक नगर येथील भीम नगरमध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. दरम्यान अजून काही दिवसात भाजप मध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होणार असून गाडी फुल्ल होण्याच्या आधी आमच्याकडे या, नंतर लटकत राहावे लागेल असे बोलत पक्ष प्रवेश करणार्यांना दरेकर यांनी यावेळी साकडे घातले.

चित्रा वाघ यांचा पुष्पा चित्रपट डायलॉग
ठाणे महानगर पालिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच ठाण्यात पक्ष प्रवेशाचा धडका सुरु असतानाच देखील ठाण्यातील वर्तक नगर येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात भाजप च्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर चक्क पुष्पां चित्रपटातील डॉयलॉग ऐकवून राज्यातील सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले.'भाजप नाम सूनकर,फ्लावर समजे क्या, फायर है हम' असा डायलॉग चित्रा वाघ यांनी मारला. विधान परिषदेचे विरोधी प्रवीण दरेकर यांनी देखील भाषणाच्या दरम्यान सरकार वर टीका केली. तसेच ठाण्यातील विकासा बरोबरच त्यांनी टँकर लॉबीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली .

वैशाली माडे प्रकरण गंभीर
राज्यात कोणीही सुरक्षित नाही त्यांना कोणीतरी त्रास देताय एक महिना तक्रार देऊनही कारवाई होत नाही यावरून पोलीस गंभीर नाहीत हे दिसून येतेय हे सांगत भाजप पूर्णपणे वैशाली माडेंच्या सोबत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा :गॅस एजन्सी कामगाराला धमकी देऊन बेदम मारहाण; माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details