महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Malnutrition News: ठाण्यात कुपोषणाच्या वाढत्या संख्येने पोषण आहार योजनाच ‘व्हेंटिलेटर’वर; शिंदे सरकारचे मात्र याकडे डोळेझाक - अमृत आहार योजना

कुपोषणाच्या ( Malnutrition )अहवालानुसार २०२१-२२ या वर्षांतील ठाणे जिल्ह्यात १२२ बालके तीव्र कुपोषित, ( children are severely malnourished in Thane district ) तर १ हजार ५३१ बालके मध्यम कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे कुपोषित बालकांची जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक संख्या एकट्या शहापूर तालुक्यात असल्याचे उघडकीस आले असून ७९५ बालके कुपोषित ( Severely malnourished children ) असल्याचे आढळून आले आहे.

Malnutrition
कुपोषण

By

Published : Sep 6, 2022, 5:31 PM IST

ठाणे :कुपोषणाच्या अहवालानुसार २०२१-२२ या वर्षांतील ठाणे जिल्ह्यात १२२ बालके तीव्र कुपोषित,( Severely malnourished children ) तर १ हजार ५३१ बालके मध्यम कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे कुपोषित बालकांची जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक संख्या एकट्या शहापूर तालुक्यात असल्याचे उघडकीस आले असून ७९५ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी तीव्र कुपोषित असलेली ८५ बालके मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोषण आहार योजनाच ( Nutritional Diet Scheme Thane ) ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे ( Poshan Ahar Yojana on 'Ventilator' ) दिसून आले.

ठाण्यात कुपोषणाच्या वाढत्या संख्येने पोषण आहार योजनाच ‘व्हेंटिलेटर’वर; शिंदे सरकारचे मात्र याकडे डोळेझाक



जिल्ह्यात १ हजार ८५४ अंणवाड्या -ठाणे जिल्हा परिषदेच्या ( Thane Zilla Parishad ) एकूण १ हजार ८५४ अंणवाड्या आहेत. यामध्ये ० ते ५ वयोगटातील बालकांचे दर महिन्याला वजन घेतले जाते. ज्या बालकांचे वजन कमी असेल त्यांच्या पालकांना बालकास योग्य पोषण आहार ( Nutritional Diet Scheme Thane ) देण्याबाबत सूचना केल्या जातात. अंगणवाडीतील बालकांना सकस आहार देण्यासाठी भर दिला जातो. दर महिन्याला कुपोषित बालकांमधील सुधारणा आणि नव्याने कुपोषित झालेल्या बालकांची माहिती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडे दिली जाते. या बालकांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देऊन त्यांना सदृढ बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. तरीही या काळात कुपोषित बालकांची वाढती संख्या चिंताजनक बनली आहे.



कुपोषणाची समस्या अजूनही गंभीर -० ते ५ वर्ष वयोगातील तीव्र कुपोषित (सॅम) बालके मध्यम कुपोषित (मॅम) गटात आल्यावर त्यांना पोषण आहार आणि औषधोपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मॅम गटातील बालक पुन्हा सॅम गटात जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषतः शहापूर, भिवंडी, मुरबाड तालुक्यात कुपोषणाची समस्या अजूनही गंभीर रूप धारण करत असल्याने यावर तातडीने राज्य सरकारने लक्ष देऊन कुपोषणामुळे होणाऱ्या बालकांचे बळी जाऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपसून श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी प्रमोद पवार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून करीत आहेत.



गेल्या महिन्यात कुपोषणामुळेच सात बालकांचा मृत्यू -शहापूर तालुक्यात मिनी अंगणवाड्यांसह ७२९ अंगणवाड्या असून त्यामध्ये ३० हजार ४१७ बालके आहेत. यात दर महिन्याला ० ते ६ वयोगटातील मुलांचे अंगणवाडी सेविकांमार्फत वजन केले जाते. ते कमी असल्यास या बालकांची मध्यम कुपोषित आणि तीव्र कुपोषित अशी वर्गवारी होते. कुपोषित बालकांठी तसेच गर्भवती व स्तनदा मातांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आहार योजनांचा लाखो रुपये खर्च करून ग्रामीण भागातील मुलांना पोषण आहार दिला जातो. मात्र त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे दिसून आले आहे. दरमहा लाखो रुपये या योजनेसाठी निधी खर्च करूनही बोजवारा उडाला आहे. तर गेल्या महिन्यात कुपोषणामुळेच सात बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.



तेलच नाही तर अन्न शिजवायचे कसे? -शेती हंगामाव्यतिरिक्त रोजगारासाठी भटकंती करावी लागत असल्याने कुपोषण फोफावत चालले आहे. विद्यमान शिंदे सरकार मात्र याकडे डोळेझाक करीत ( But the Shinde government turned a blind eye to this ) असल्याने कुपोषणाची तीव्रता वाढत चालली आहे. तालुक्यातील शहापूर प्रकल्पांतर्गत ७१० बालके मध्यम कुपोषित तर ८५ बालके तीव्र कुपोषित आढळून आली. आहार योजनेमध्ये ५० दिवस पुरेल इतके गहू, मुगडाळ, चणाडाळ, साखर, हळद, मीठ, मिरची आदी साहित्य देण्यात येते. मात्र हा कच्चा आहार शिजविण्यासाठी आवश्यक असणारे तेल देण्यात येत नसल्याने तेला अभावी आहार शिजवायचा कसा हा जटील प्रश्न निर्माण आहे.



अमृत आहार योजनेला महागाईचा फटका -गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी असलेल्या अमृत आहार योजनेला ( Amrut diet plan ) महागाईचा फटका बसला आहे. या योजनेत धान्य विकत घेऊन व शिजवून या मातांना अवघ्या ३५ रुपयात देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची पिळवणूक होत असून दुसरीकडे महागाई गगनाला भिडली असताना अवघ्या ३५ रुपयेप्रमाणे ताट देणे अशक्यच असल्याने त्यांना परिपूर्ण आहार मिळत नसल्याची ओरड होत आहे. अशा अनेक कारणांमुळे कुपोषित बालकांची संख्या वाढत चालल्याचा आरोप विधायक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत उबाळे यांनी केला असून राज्यशासन मात्र कुपोषणाच्या विषयी गंभीर नसल्यामुळे शहापूर तालुक्यात सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या असल्याचेही सांगितले. तर शहापूर तालुक्यातील पोषण आहार योजनाचे काम महिला व बालविकास विभागाकडे असून येथील अधिकाऱ्याशी संर्पक साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा :कोविड झालेल्या व टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असलेल्या पुरुषांना हॉस्पिटलायझेशनचा धोका

ABOUT THE AUTHOR

...view details