महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गटातील आमदाराला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी - शिवाजीनगर पोलीस ठाणे

ज्यातील सत्ता संघर्षासाठी शिवसेना व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात राजकीय लढाई सुरु असतानाच, एकनाथ शिंदे गटात सामील असलेले अंबरनाथ विधानसभेचे बंडखोर सेना आमदार डॉ. बालाजी किणीकर (MLA Dr Balaji Kinikar) यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

MLA. Dr. Balaji Kinikar
आ. डॉ. बालाजी किणीकर

By

Published : Jun 29, 2022, 7:24 PM IST

ठाणे: राज्यातील सत्ता संघर्षासाठी शिवसेना व शिंदे गटात राजकीय लढाई सुरु असतानाच, एकनाथ शिंदे गटात सामील असलेले अंबरनाथ विधानसभेचे बंडखोर सेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. काय दिली निवानी पत्राव्दारे धमकी.

आमदार बालाजी तेरेको गोली
मारनेका दिन आ गया हे हामारे
अंबरनाथ के शिवसेना नेता को
तकलीफ देता है इसिलिए तुझे
मारनेका हे बता इसलिये रहा हु
जब में मारूंगा वह दिन तय हे
तब तक तू रोज डर डर के जिये

अशा आशयाचे धमकीचे निनावी पत्र आ. बालाजी किणीकर यांना पाठवलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच किणीकर यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. तर याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा : MLA Devendra Bhuyar : राज्यात सत्तेच्या बोहल्यावर चढण्यासाठी रस्सीखेच; पण हे आमदार साक्षगंधात मग्न...

ABOUT THE AUTHOR

...view details