ठाणे- ठाणे मतदारसंघ भाजपच्या वाटेला गेल्याने त्याचा लाभ महाराष्ट्र नवनिर्माण सेना उचलत असल्याचे दिसत आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना १४८ ठाणे शहर मतदार संघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ठाण्याचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना ऐवजी मनसेच दिघे कार्ड वापरणार असल्याची जोरदार चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू होते. त्यानंतर या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी उमेदवारी मिळाली. हा मतदार संघ शिवसेनाला मिळावा यासाठी शिवसैनिकांनी जोरदार लॉबिंग केली होती. मात्र भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना ही उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा-झारखंडहून खुन करून फरार झालेल्या आरोपीच्या उल्हासनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या