महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासा दायक बातमी : म्यूकोर माइकोसिस लवकरच नाहीसा होणार - Mucor microsis will disappea

गेल्या महिनाभरात म्युकोरमाइकोसिसच्या रुग्णांची संख्या सुमारे ८० टक्यांनी वाढली असून, मृतांच्या संख्येतही सुमारे ८३ टक्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे आहेत. हे एकीकडे जरी सुरु असले तरी एक दिलासादायक बातमी समोर येत आहेत. येत्या जुलैच्या शेवट पर्यंत म्युकर मायकोसिस सारखा आजार महाराष्ट्रातून नाहीसा होणार, असा महत्वाचा खुलासा म्युकोर माइकोसिस टाक्सफोर्स चे प्रमुख डॉ आशिष भूमकर यांनी केला.

म्यूकर मायकोसिस लवकरच नाहीसा होनार
म्यूकर मायकोसिस लवकरच नाहीसा होनार

By

Published : Jun 17, 2021, 2:20 AM IST

Updated : Jun 17, 2021, 6:34 AM IST

ठाणे-कोरोनाशी दोन हाथ करत असतानाच, म्युकोर माइकोसिस सारख्या आजाराने डोकं वर काढले. आणि लोकांची चिंता अजून वाढवली. मे च्या पहिल्या आठवडय़ापासून म्युकरच्या रुग्णांची नोंद करण्यास सुरुवात झाली. मे च्या पहिल्या १५ दिवसांमध्ये म्युकरचे १४८७ रुग्ण होते. तर मृत्यूची संख्या १०७ होती. परंतु जून मध्यपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख जवळपास सातपटीने वाढला आहे. सध्या राज्यात ७३९५ रुग्ण असून ६४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात म्युकरचा मृत्युदर सुमारे नऊ टक्के आहे. राज्यात करोनाची लाट ओसरत आली तरी म्युकरचा प्रादुर्भाव मात्र वाढताना दिसत आहे.

म्यूकर मायकोसिस लवकरच नाहीसा होनार

जुलैच्या शेवट पर्यंत म्युकर मायकोसिस सारखा आजार महाराष्टातून नाहीसा होणार

गेल्या महिनाभरात म्युकोरमाइकोसिसच्या रुग्णांची संख्या सुमारे ८० टक्यांनी वाढली असून, मृतांच्या संख्येतही सुमारे ८३ टक्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे आहेत. हे एकीकडे जरी सुरु असले तरी एक दिलासादायक बातमी समोर येत आहेत. येत्या जुलैच्या शेवट पर्यंत म्युकर मायकोसिस सारखा आजार महाराष्ट्रातून नाहीसा होणार, असा महत्वाचा खुलासा म्युकोर माइकोसिस टाक्सफोर्स चे प्रमुख डॉ आशिष भूमकर यांनी केला. तर पहिल्यांदा हा आजार जेव्हा समोर आला तेव्हा या विषयी उपचार यंत्रणा जागी झाली. परंतु सध्या जे करोनाचे उपचार घेत आहेत, त्यांची मधुमेह कसा कंट्रोल मध्ये राहील याकडे डॉक्टर आवर्जून पाहत आहेत. तर त्यांचे वारंवार म्युकोर माइकोसिस ची टेस्ट केली जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात हे रुग्ण हळू हळू कमी होणार आहेत. तसेच या आजाराची औषधें ही आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या आजारावर अंकुश बसणार आहे. असा भूमकर यांनी खुलासा केला.

प्रत्येक डॉक्टरांकडे या रुग्णांची नोंद

अनेक रुग्ण हे अनेक कान, नाक स्पेशालिस्टकडे म्युकोर माइकोसिस बाबत सल्ला घेताना दिसतात. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरांकडे या रुग्णांची नोंद होते. त्यामुळे एकाच रुग्णाची अनेक डॉक्टरांकडे नोंद होते. यासाठी आकडेवारी वाढलेली दिसते. तर अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा आणि वाढलेल्या भरमसाट कीमती यामुळे जिथे इंजेक्शन मोफत उपलब्ध असेल, अशा ठिकाणी रुग्ण मोठय़ा प्रमाणात उपचारासाठी जात आहेत.

राज्यात अनेक रुग्ण घेत आहेत उपचार
राज्यात म्युकरचे सर्वाधिक रुग्ण पुणे (१२१५) आणि नागपूर (११८४)मध्ये आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी सुमारे ३२ टक्के रुग्ण या दोन जिल्ह्यांमध्ये आहेत. नागपूरमध्ये महिनाभरात रुग्णसंख्या सुमारे पाच पटीने वाढली असून, मृतांची संख्या सात वरून १०१ वर गेली आहे. पुण्यातही साधारण हीच स्थिती आहे. पुण्यामध्ये महिनाभरात रुग्णांची संख्या सुमारे चार पटीने वाढली असून मृतांची संख्या २० वरून ८५ वर गेली आहे. अशी आकडेवारी जरी समोर आली असली तरी मात्र ही आकडेवारी जुलै पर्यंत कमी झालेली नक्की दिसेल असे तज्ञ सांगत आहेत.

हेही वाचा- कोविड लस घेणाऱ्यासाठी खुशखबर.. लस घेणाऱ्यांना लोकल प्रवासास परवानगी

Last Updated : Jun 17, 2021, 6:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details