महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं घेतली जितेंद्र आव्हाडांची भेट; तर सिकंदर शेखला जिंकायचं आहे ऑलम्पिक मेडल

Maharashtra Kesari : अवघ्या काही सेकंदात महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद पटकावणारा पैलवान सिकंदर शेखनं (Sikandar Shaikh) आज श्रीमंत शाहू महाराजांचं कोल्हापुरात दर्शन घेतलं. त्यानंतर थेट ठाण्यात येत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची देखील भेट घेतली.

Maharashtra Kesari
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 10:08 PM IST

प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख

ठाणेMaharashtra Kesari : मागील वर्षी ज्याच्या पराभवाची चर्चा सर्वात जास्त झाली, असा महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सिकंदर शेख (Sikandar Shaikh) यांनी अखेर यावर्षीचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांच्यावरती मात करत महाराष्ट्र केसरी हा किताब केवळ 23 सेकंदामध्ये त्यानं पटकावला आहे. महाराष्ट्रातील सर्व स्तरातून त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. कोल्हापूर कुस्तीपटूंची पंढरी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून अनेक पैलवान कोल्हापूरच्या मातीमध्ये घडले आहेत. कोल्हापूरमध्ये अनेक तालीम देखील आहेत. त्यातीलच गंगावेश तालीममध्ये सराव करणारा सिकंदर शेख हा या वर्षीचा महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता ठरलेला आहे.

भारताला मेडल जिंकून देण्याचं स्वप्न :महाराष्ट्र केसरी विजेता झाल्यानंतर त्यानं सर्वप्रथम कोल्हापूरच्या गादीचा म्हणजेच शाहू महाराजांच्या निवासस्थानी जात कोल्हापूरच्या गादीला नमन केलं. त्यानंतर थेट ठाण्यात येत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची देखील भेट घेतली. कोल्हापूरच्या गादीला नमन केल्यानंतर माझी भेट घेणं हे माझ्यासाठी बहुमान आहे. तसेच याबद्दल सिकंदर शेखचे मी आभार मानतो असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. तर अतिशय हलकीच्या परिस्थितीतून त्याने हा विजय मिळवला आहे. गेली सोळा वर्ष ते अथक परिश्रम करत आहेत. आता पुढं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मेडल जिंकून देण्याचं स्वप्न त्याचं आहे.



सिकंदरला मिळावी नोकरी :अत्यंत हलातीच्या परिस्थितीमध्ये सोळा वर्षांच्या आतंक प्रयत्नांतर सिकंदर शेख याला महाराष्ट्र केसरी हा सन्मान मिळालेला आहे. हा सन्मान पटकवण्यासाठी त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांची मोठी मेहनत घेतली आहे. त्याला नोकरी जर मिळाली तर ऑलम्पिक मेडलपर्यंत पोहोचवू शकतो. तर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडं त्याला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीनं त्याला मदत करू असं देखील आव्हाड यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा -

  1. Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं घेतली श्रीमंत शाहू महाराजांची भेट
  2. Maharashtra Kesari Final : महाराष्ट्र केसरीची आज अंतिम लढत, 'या' मल्लांमध्ये रंगणार सामना
  3. Maharashtra Kesari : कोण होणार महाराष्ट्र केसरी? कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक यांच्यात कडवी झुंझ

ABOUT THE AUTHOR

...view details