नागपूर - शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि अनेक कार्यकर्त्यांसह रविभवनात घुसण्याचा प्रयत्न करताना पोलिस अधिकाऱ्यांमध्ये आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Breaking News : आमदार नितीन देशमुखांचा कार्यकर्त्यांसह रविभवनात घुसण्याचा प्रयत्न
19:44 December 28
आमदार नितीन देशमुखांचा कार्यकर्त्यांसह रविभवनात घुसण्याचा प्रयत्न
19:07 December 28
देशमुख सुटले, नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अखेर मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून बाहेर पडले आहेत. सुमारे 13 महिने तुरुंगात राहिलेले अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादीच्या नागपुरातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नागपुरातील देशमुखांच्या निवस्थानाबाहेर फटाके फोडत आणि गुलाल उधळत अनिल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
18:38 December 28
मुंबईत विमानतळावर 2 आंतरराष्ट्रीय प्रवासी आढळले कोविड पॉझिटिव्ह
मुंबई - येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज तपासणी केलेल्या नमुन्यात दोन आंतरराष्ट्रीय प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले. दोन्ही नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
18:29 December 28
देशात द्वेष निर्माण करणाऱ्या भाजपाला देश जोडणारी यात्रा पाहवत नाही - खरगे
मुंबई - देशाच्या लोकशाही तत्त्वांवर सतत हल्ला होताना दिसत आहे. देशभरात द्वेष पसरवला जात आहे. महागाई, बेरोजगारीमुळे जनता अडचणीत आहे पण सरकारला त्याची पर्वा नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त म्हटले आहे. देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. भारत जोडो यात्रेमधून जनतेने पक्षाला भरघोस समर्थन दिले. या देशात द्वेष निर्माण करणाऱ्या भाजपासारख्या पक्षाला जोडणारी यात्रा पाहवत नाही, अशी टीकाही खरगे यांनी केली.
18:20 December 28
सांगोवांगी माहितीवरुन परमबीर सिंग यांनी केले आरोप - अनिल देशमुख यांची सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया
मुंबई - सांगोवांगी माहितीवरुन परमबीर सिंग त्यांच्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर आरोप केले. त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. अशी पहिली प्रतिक्रिय मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
17:27 December 28
यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही - सुशील कुमार शिंदे
सोलापूर - यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मांडली आहे. ते काँग्रेसच्या स्थापना दिन कार्यक्रमानंतर पत्रकारामंशी बोलत होते.
17:11 December 28
मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू - एकनाथ शिंदे
नागपूर - कर्नाटकने आम्हाला आव्हान देऊ नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह 865 गावांची एक इंचही जमीन आम्ही सोडणार नाही, असेही ते म्हणाले. त्यासाठी कायदेशीर मार्गाने जे लागेल ते करू, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारला विनंती करू, असेही ते म्हणाले. आमच्या मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत दिली.
17:03 December 28
बलात्काराच्या १९ वर्षीय आरोपीची तळोजा कारागृहात आत्महत्या
ठाणे - तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या एका 19 वर्षीय तरुणाने बुधवारी सकाळी कारागृहाच्या आवारात गळफास लावून घेतला. नवी मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. या नराधमाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करून २२ डिसेंबर रोजी तळोजा कारागृहात आणण्यात आले होते, असे खारघर पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे यांनी सांगितले.
16:58 December 28
अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहातून सुटका
मुंबई : 100 कोटी वसुली घोटाळ्याचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला. आज त्यांची आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली. अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जय्यत तयारी करण्यात आली. अनिल देशमुख गेल्या 13 महिन्यांपासून आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत होते.
16:50 December 28
टीव्हीएफचे संस्थापक अरुणभ कुमार यांची लैंगिक छळप्रकरणी निर्दोष मुक्तता
मुंबई - न्यायालयाने द व्हायरल फीव्हर (टीव्हीएफ) चे संस्थापक अरुणभ कुमार यांची 2017 च्या लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात अस्पष्ट आणि अवास्तव विलंब झाला होता, असे कारण यामध्ये देण्यात आले आहे.
16:42 December 28
समृद्धी एक्स्प्रेस वेवर अपघात, वकिलाच्या पत्नीसह 4 वर्षांची मुलगी ठार
मुंबई - बुधवारी पहाटे नव्याने सुरू झालेल्या समृद्धी एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात 35 वर्षीय महिला आणि तिच्या चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर तिचा पती आणि त्यांची दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
16:37 December 28
देशमुखांची होणार सुटका, आर्थर रोड कारागृहाकडे जाणारा मार्ग बंद
मुंबई - आर्थर रोड कारागृहाकडे जाणारा मार्ग मुंबई पोलिसांकडून बंद करण्यात आलेला आहे. अनिल देशमुख यांची आज कारागृहातून सुटका होणार असल्याने या परिसरामध्ये खबरदारी म्हणून हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोडी पाहायला मिळाली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
16:36 December 28
ठाण्यात नवजात मुलगी मृतावस्थेत आढळली
ठाणे - एका गावात नवजात मुलगी मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. भिवंडी शहरातील खोनी गावात एका कारखान्याच्या पाठीमागे झुडपात पांढर्या कपड्यात गुंडाळलेला मृतदेह पाहिल्यानंतर एका प्रवाशाने मंगळवारी पोलिसांना खबर दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
16:19 December 28
पंतप्रधान मोदी आईची तब्येत पाहण्यास रुग्णालयात दाखल
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मातोश्रींची तब्येत बिघडल्याने शहरात पोहोचले आहे. ते येथील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये गेले आहेत. या रुग्णालयात त्यांची आई हीराबेन मोदी यांना दाखल केले आहे.
15:41 December 28
शीझानला भेटल्यावर तुनिषा हिजाब वापरायला लागली - तुनिषाचे काका
पालघर - शीझानचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे पोलिसांनी आज न्यायालयासमोर सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करावा अशी मागणी, तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा यांनी केली आहे. तसेच त्याला भेटल्यावर तुनिषाने हिजाब घालण्यास सुरुवात केली होती अशीही माहिती पवन शर्मा यांनी दिली.
15:16 December 28
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेच्या आदेशावर न्यायालयाची मोहोर
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेच्या आदेशावर न्यायालयाने मोहोर उमटवली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही तुरुंगातून बाहेर येणार आहेत, हे निश्चित झाले आहे. मुंबई सत्र न्यायालयातून सुटकेचा आदेश मिळाला आहे. थोड्याच वेळात सदर आदेश पत्र आर्थर रोड तुरुंगाच्या पत्र पेटीत टाकले जाणार आहे. जामीनाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्यांची सुटका होईल. मात्र अनिल देशमुख यांना प्रत्यक्षात तुरुंगाबाहेर येण्यास संध्याकाळ होण्याची शक्यता आहे.
14:57 December 28
वॉर्डबॉयचा डॉक्टरवर हल्ला, अटक करुन गुन्हा दाखल
नाशिक - येथील हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय अनिकेत डोंगरे याने एका महिला डॉक्टरवर शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाने हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वॉर्ड बॉयला अटक केली आहे. डॉक्टरांची प्रकृती स्थिर आहे.
14:26 December 28
मुंबईत 80 लाखांच्या बनावट नोटा जप्त
मुंबई - पवई येथील आंबेडकर नगर गार्डन नजीक मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 10 ने 80 लाखांच्या बनावट भारतीय चलनातील नोटा जप्त केल्या आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
13:39 December 28
देशमुखांच्या सुटकेनंतर प्रस्तावित रॅलीला परवानगी नाकारली
मुंबई - अनिल देशमुख यांच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटकेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीला ना म जोशी नगर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
13:34 December 28
लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर
नागपूर - लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. लोकायुक्तांच्या कक्षेत आता लोकप्रतिनिधींसह मंत्री आणि मुख्यमंत्रीही येणार आहेत. विरोधकांनी लोकायुक्त विधेयक मंजूर करण्याआधी विधेयकावर चर्चेची मागणी केली होती. मात्र आज विरोधकांच्या अनुपस्थितीत विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश हे लोकायुक्त असतील. लोकायुक्त समितीत सात सदस्य राहतील. त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्ष नेते,अध्यक्ष व उपाध्यक्ष करतील. लोकायुक्तांकडे येणारे खटले 1 वर्षात निकाली काढावे लागणार आहेत.
13:31 December 28
पंतप्रधान मोदींच्या आई हिराबा अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
अहमदाबाद : पंतप्रधान मोदींच्या आई हिराबा (pm modi mother hiraba critical health) यांना अहमदाबादमधील UN मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींच्या आई 100 वर्षांच्या आहेत. नुकतेच गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी पोहोचल्या होत्या.
13:27 December 28
टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारासंदर्भात चौकशी होणार - फडणवीस
नागपूर - MVA नियमादरम्यान TET परीक्षा घेण्यास अपात्र ठरलेल्या कंपन्यांना पात्र बनवण्याबाबत महाराष्ट्र सरकार उच्चस्तरीय चौकशी करेल आणि कठोर कारवाई केली जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा आज विधिमंडळात केली.
13:24 December 28
कुपर रुग्णालयातील हॉस्टेलला भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
नागपूर - विलेपार्ले येथील पालिकेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयामधील हॉस्टेल बांधून पूर्ण झाले आहे. मात्र हॉस्टेल इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसल्याने ग्रामीण भागातून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
13:20 December 28
ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश, 4 किलो चरस जप्त, दोघांना अटक
मुंबई - एनसीबी मुंबईने ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून 4 किलो चरस जप्त करण्यात आले तर दोघांना अटक केली आहे.
12:33 December 28
नियमानुसारच गायरान जमीन वाटप - अब्दुल सत्तार यांचा विधानसभेत दावा
नागपूर -नियमानुसारच गायरान जमीन वाटप केल्याचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दावा केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनीही आदेश दिल्याची सत्तार यांनी माहिती दिली. विरोधकांनी जमिनी हडप केल्याचा आरोप यावेळी केला. न्यायालय या प्रकरणात जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असेही, सत्तार यांनी स्पष्ट केले. जमिनीचा ताबा मिळावा म्हणून योगेश खंडारे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
12:09 December 28
सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आजही निदर्शने
नागपूर- सरकारी जमिनीच्या कथित बेकायदेशीर नियमितीकरणावरून विरोधी आमदारांनी आज पुन्हा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
12:05 December 28
संघ परिवाराचे लोकच भारताचे तुकडे-तुकडे करत आहेत - अय्यर
नवी दिल्ली : संघ परिवाराचे लोकच धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर भारताचे तुकडे-तुकडे करत आहेत. याच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. देश तोडण्याच्या प्रयत्नांविरुद्ध लढले पाहिजे, असे मत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केले आहे.
11:54 December 28
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेची तयारी सुरू
मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाची कायदेशीर प्रक्रिया मुंबई सत्र न्यायालयात सुरू करण्यात आली आहे. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग त्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत. दुपारपर्यंत जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून देशमुख यांचा सुटकेचा आदेश मिळाल्यानंतर ते आर्थर रोडकडे रवाना होणार आहेत.
11:50 December 28
आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणातील सर्व आरोपी सत्र न्यायालयात दाखल
मुंबई -आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणातील सर्व आरोपी सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत. आयसीआयसीआय बँक माजी MD चंदा कोचर, व्हिडिओकॉन कंपनीचे माजी CEO दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात हजर केले आहे. तिघांची कोठडी संपत असल्याने आज सुनावणी होत आहे.
11:46 December 28
विक्रम नागरे, मुकेश शहाणे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल
नाशिक - भाजप प्रदेश पदाधिकारी तथा नगरसेवक पुत्र विक्रम नागरे आणि भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10:34 December 28
विधीमंडळाचे कामकाज ३० डिसेंबरपर्यंत चालणार
विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीने विधीमंडळाचे कामकाज ३० डिसेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
09:58 December 28
अधिवेशनाचा कालावधी ३ आठवडे करावा-विरोधी पक्षनेत्यांची मागणी
अधिवेशनाचा कालावधी ३ आठवडे करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ते शासकीय विमानाने मुंबईत येणार आहेत.
09:56 December 28
आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेला १ रुग्ण कोरोनाबाधित आढळला
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेला १ रुग्ण कोरोनाबाधित आढळला आहे. विमानतळावर कोरोनाचाचणी केल्यानंतर व्यक्तीला कोरोनाची बाधा असल्याचे कळाले. जनुकिय तपासणीसाठी नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. सध्या, पुणे जिल्हयात कोरोनाचे ५४ सक्रिय रुग्ण आहेत.
09:44 December 28
आमचा लढा आरएसएस-भाजप विरुद्ध विचारधारेचा - अशोक गेहलोत
आमचा लढा आरएसएस-भाजप विरुद्ध विचारधारेचा आहे. ते लोकशाही कमकुवत करत आहेत आणि लोक ते सहन करणार नाहीत. 50 वर्षांनंतर एक दलित आमच्या पक्षाचा अध्यक्ष झाला आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.
09:08 December 28
काँग्रेस पक्षाचा आज १३८ वा स्थापना दिवस, आज करणार साजरा
काँग्रेस पक्ष आज 138 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे.
08:29 December 28
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
जम्मूच्या सिध्रा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
06:44 December 28
नेपाळमध्ये भूकंप, ५.३ रिश्टर स्केलची नोंद
नेपाळच्या बागलुंग जिल्ह्यात ४.७ आणि ५.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
06:44 December 28
घराला आग लागून कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील मऊ येथील शाहपूर गावात घराला आग लागल्याने एका कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच मदत पथके घटनास्थळी दाखल झाली.
06:26 December 28
Breaking News : काँग्रेस पक्षाचा आज १३८ वा स्थापना दिवस, आज करणार साजरा
मुंबई : ठाकरे गटातील एक माजी नगरसेवक गेले अनेक दिवसांपासून २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी फरार होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्षाने या माजी नगरसेवकाला अटक केली आहे. योगेश भोईर असे अटक करण्यात आलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.