ठाणे - भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी गेलेल्या एका व्यक्तीची हत्या झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथ तालुक्यातील आंबे गावात घडली ( Thane Man Murder For Trying Resolve Fights ) आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात ( Hillline Police Station ) हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. अभिमन्यू भाग्यवंत, असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. तर, काथोड भाग्यवंत, असे हत्या झालेल्याचे नाव आहे.
उपचारादरम्यान मृत्यू - मृतक व आरोपी अंबरनाथ तालुक्यातील आंबे गावात राहतात. त्यातच २० मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी अभिमन्यू भाग्यवंत आणि त्याचा नातेवाईक गंगाराम भाग्यवंत यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. ह्या दोघांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी मृत काथोड भाग्यवंत हा गेला याचा राग आरोपी अभिमन्यूला आल्याने लाकडी दांडक्याच्या साहाय्याने त्याच्यावर हल्ला चढवला. यात काथोड च्या डोक्यात, पाठीवर आणि हातावर गंभीर दुःखात झाल्याने सुरूवातीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. प्रकृती खालावल्याने कळवा आणि सायन रुग्णालयात हलविलं. मात्र, शुक्रवारी ( 27 मे ) कथोड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.