ठाणे- जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात शिवसेना ९ आणि भाजप ९ असे १८ उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे शतप्रतिशत भाजप हा नारा जिल्ह्यात खरा ठरला. भाजपने ९ ही मतदारसंघ जिंकल्याने जिल्ह्यात भाजपचा बोलबाला असल्याचे सिद्ध केले. मात्र, शिवसेनेला ५ जागेवर विजयी मिळवत 4 ठिकाणी पराभव पत्करावा लागला.
ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघापैकी ९-९ जागा भाजप व शिवसेनेच्या वाट्याला येऊन युतीमध्ये लढल्या होत्या. भाजपने ९ जागा लढवल्या व सर्व ९ ही जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने ९ जागा लढवल्या मात्र पाचच जागा शिवसेनेला जिंकता आल्या आहेत. तर दोन जागेवर राष्ट्रवादी तर प्रत्येकी १ जागेवर मनसे आणि समाजवादी जिंकली, उल्हासनगरमधून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा भाजपचे कुमार आयलींनी पराभव करून राष्टवादीच्या ताब्यातील जागा खेचून आणली.
ठाणे जिल्ह्यात भाजपचे आमदार (९)
१)किसन कथोरे(मुरबाड)
२)संजय केळकर(ठाणे)
३)गणेश नाईक(एरोली)
४) मंदा महात्रे(बेलापूर नवी मुंबई)
५)रवींद्र चव्हाण(डोंबिवली)
६)महेश चौघुले (भिवंडी पश्चिम)
७)कुमार आयलानी (उल्हासनगर)
८) गणपत गायकवाड (कल्याण पूर्व)
९)गीता जैन भाजप बंडखोर(मीरा भाईंदर).