ठाणे -औषध दुकानदाराकडून जबरदस्तीने पैशांची मागणी केल्यानंतर दोन पोलिसांना निलंबित तर दोन पोलिसांंवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. ही घटना नवघर येथे 6 मे रोजी घडली होती. औषध दुकानदाराने केवळ औषध विकण्याऐवजी शक्तीवर्धक द्रव विकत असल्याच्या कारणातून, संशयित आरोपी असलेल्या पोलीस शिपायांनी त्यांच्याकडून गुन्हा दाखल न करण्याच्या अटीवर लाचेची मागणी केल्याचा आरोप होता.
औषध दुकानदाराकडे लाचेच्या मागणीनंतर चार पोलिसांवर कारवाई
चार पोलीस शिपाई नवघर येथील औषध दुकानात गेल्यानंतर, त्यांना काही शक्तीवर्धक द्रव आढळून आले. त्यांनी त्यानंतर गुन्हा दाखल न करण्याच्या अटींवर दुकानदाराकडून 18 हजार रुपये घेतले आणि 1 लाख रुपयांची मागणी केली.
औषध दुकानाराकडे लाचेच्या मागणीनंतर चार पोलिसांवर कारवाई
चार पोलीस शिपाई नवघर येथील औषध दुकानाकात गेल्यानंतर, त्यांना दुकानात काही शक्तीवर्धक द्रव आढळून आले. त्यांनी त्यानंतर गुन्हा दाखल न करण्याच्या अटींवर दुकानदाराकडून 18 हजार रुपये घेतले आणि 1 लाख रुपयांची मागणी केली. पोलीस शिपाई किरण घुगे आणि अमोर राऊळ यांना निलंबित करण्यात आले आहे तर इतर दोघांची बदली करण्यात आली आहे.