ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारांचा वर्चस्ववाद उफाळून आला आहे. या वर्चस्ववादातून दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्याचा चाकूने वार करुन खून केला आहे. अमोल लोखंडे (वय ३९) असे हत्या झालेल्या गुडांचे नाव आहे. तर टक्या उर्फ जयेश डोईफोडे ( वय ३२) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. टक्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ही घटना कल्याण पूर्वेतील समता नगर भागात असलेल्या नवीन दुर्गामाता मंदिर रोडवर घडली आहे.
भर रस्त्यात चाकूने केले सपासप वार :अमोल लोखंडे आणि टक्या उर्फ जयेश यांच्यामध्ये वर्चस्ववादातून भांडण होते. त्यामुळे या दोघांमध्ये कायमच वितुष्ठ असायचे. त्यातच यातील टक्या उर्फ जयेश डोईफोडे याने अमोल लोखंडे याची कल्याण पूर्वेतील समता नगर भागात असलेल्या नवीन दुर्गामाता मंदिर रोडवर सपासप वार करुन हत्या केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर टक्या उर्फ जयेश डोईफोडे ( वय ३२) या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केले आहे.
खून करुन घटनास्थळावरून झाला फरार :कल्याण पूर्वेतील विवीध भागात स्थानिक गुंडांच्या टोळ्या आजही आपआपल्या भागात गुन्हेगारीचे वर्चस्व राहावे, यासाठी नेहमीच टोळी युद्ध पाहवयास मिळत आहे. त्यातच मृत अमोल व आरोपी जयेश यांच्यात पूर्वीपासूनच पूर्ववैमनस्य होते. परिसरात वर्चस्व राखण्यासाठी पुन्हा दोघांमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास कल्याण पूर्वेतील समता नगर भागातील नवीन दुर्गामाता मंदिर रोडवर वाद झाला. याच वादातून भररस्त्यात हल्लेखोर गुंड जयेशने अमोलची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला होता.
न्यायालयाने ठोठावली पोलीस कोठडी :दरम्यान घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करत अमोलचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. दुसरीकडे हल्लेखोर जयेशवर हत्येचा गुन्हा दाखल करून कोळसेवाडी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता, काही तासातच त्याला ताब्यात घेऊन अटक केली. अटक आरोपीला आज (सोमवारी ) कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने टक्या उर्फ जयेशला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस. जी. गवळी हे करीत आहेत.
हेही वाचा -
- Mumbai Crime News : मजुराने डोक्यात हातोडा मारून केला दुसऱ्या मजुराचा खून
- Triple Murder In Bihar : माथेफिरू बापलेकांनी चाकूने भोसकले; जमिनीच्या वादातून घडले तिघांचे हत्याकांड, अनेकजण जखमी