ठाणे- रविवारी (दि. 5 जुलै) आषाढ पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण होणार आहे. पण, ते भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, रविवारी 5 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 34 मिनिटांपासून 9 वाजून 25 मिनिटांपर्यंत चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेतून जाणार आहे. पण, त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तरपूर्व भाग सोडून आफ्रिका, यूरोपचा दक्षिण-पश्चिम भाग, अंटार्क्टिका, उत्तर भाग सोडून अमेरिका, न्युझिलॅण्ड येथून दिसणार आहे.