ठाण्यात ठिकठिकाणी हॉटेल व्यावसायिक सज्ज ठाणे :फेब्रुवारी महिन्याला प्रेमी युगलांचा महिना मानला जातो. महिन्याच्या 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत अनेक प्रकारचे डे भेटवस्तू, ग्रीटिंग्स देऊन साजरे केले जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांचे लक्ष लागलेले असत ते 14 तारखेकडे अर्थात व्हॅलेंटाईन डे. कारण हा दिवस असतो तो एकमेकांविषयी प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो.
ठाण्यात हॉटेल सज्ज : व्हॅलेंटाईन दिवस येण्याआधीच प्रेमी युगल विशेष नियोजन करत असतात. आणि या दिवसाचा सर्वात जास्त संबंध येतो तो म्हणजे हॉटेल व्यावसायिकांशी. प्रेमी युगल, तरुण तरुणी तसेच मित्र मंडळींना यादिवशी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना आणि शक्कल लढवण्यात येत असतात. यावर्षी देखील ठाण्यात ठिकठिकाणी हॉटेल व्यवसायिक सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत.
हॉटेलांमध्ये विशेष सजावट : ठाण्यातील घोडबंदर रोड येथील बॉम्बे स्पिरिट हॉटेलचे मालक सोहम यादव यांनी देखील कपल्सला आपल्या हॉटेलकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणि कल्पना आखल्या आहेत. व्हॅलेंटाईन डे निमित्त सोहमने देखील नव प्रेमी युगलांसाठी हॉटेलच्या जेवणात 10 टक्क्यांची सूट, कॅण्डल लाईट डिनर, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, एकमेकांना प्रपोज करण्यासाठी एक खास व्यवस्था, लाईट आणि फुग्यांची आकर्षक सजावट, सेल्फी पॉईंट, आपल्या प्रेयसीसाठी रोमँटिक गाणी अशा अनेक प्रकारचे नियोजन केलेल आहे. दरवर्षी व्हॅलेंटाईन डे निमित्त हॉटेल्स ला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र यंदा प्रेमी युगलांचा प्रतिसाद पाहता या ठिकाणी बसण्याची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा या ठिकाणी रेकॉर्ड कपल्स येऊन प्रेमाचा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतील, अशी भावना बॉम्बे स्पिरिट हॉटेलचे मालक सोहम यादव यांनी व्यक्त केली आहे.
अनेक व्यवसायांना चालना : प्रेमी युगुल विद्यार्थी आणि सर्वच लोक या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतात या दिवशी हॉटेल्स मॉल्स सिनेमागृह यांचा विशेष व्यवसाय होतो यावरच लक्ष केंद्रित करत व्यावसायिक देखील अनोख्या युक्ती वापरत ग्रहाकाना आकर्षित करतात. या दिवसाला असलेले महत्त्व लक्षात घेवून अगदी त्यासाठी विशेष शॉपिंग देखील केली जाते भेटवस्तू ग्रिटींग कार्ड आणि फुलांची मागणी ही या दिवशी मोठ्या प्रमाणात असते एकूणच हा दिवस अनेक व्यवसायांना चालना देत असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : Valentine Day : 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त बाजारात गुलाबांची मोठ्या प्रमाणात मागणी; दरात विक्रमी वाढ