महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैशासाठी वेठीस धरून त्रास देणाऱ्या प्रेयसीची हत्या; प्रियकर पोलीस कर्मचाऱ्यासह मेव्हणा गजाआड - उल्हासनगर पोलीस बातमी

हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने त्याचा मेव्हणा कल्पेश उर्फ केशव याला स्मशानभूमी जवळ बोलावले होते. मात्र, स्मशान नजीक एका ढाब्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची खबर विठ्ठलवाडी पोलिसांनी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वॅग्नर कारमधून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. शिवाय दोन्ही आरोपीना घटनास्थळी ताब्यात घेऊन दोघांना हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर आज बुधवारी (१५ जून ) हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांवर भादंवि कलम ३०२, २०१, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

lover police officer arrested for girlfriend murder at ullhasnagr in thane
पैशासाठी वेठीस धरून त्रास देणाऱ्या प्रेयसीची हत्या

By

Published : Jun 15, 2022, 10:19 PM IST

Updated : Jun 15, 2022, 10:35 PM IST

ठाणे - पैशांसाठी वारंवार वेठीस धरून त्रास देणाऱ्या प्रेयसीची पोलीस कर्मचारी असलेल्या प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मधील कैलास कॉलनीनजीक असलेल्या स्मशान भूमी जवळ घडली. खळबळजनक बाब म्हणजे प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीचा मेव्हणा स्मशानभूमी नजीक आला होता. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून दोघा आरोपीना अटक केली आहे. सचिन गोरखनाथ खाजेकर (वय ३९ रा. सुभाष टेकडी, उल्हासनगर ) असे हत्येप्रकरणी अटक प्रियकराचे नाव आहे. तर गुन्ह्यात मदत करणारा कल्पेश उर्फ केशव खैरनार (वय ३१रा. वीर तानाजी नगर, उल्हासनगर ) असे मेव्हण्याचे नाव आहे. तर आशा बाजीराव मोरे (वय ५१,रा. औरंगाबाद) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे.

पैशासाठी वेठीस धरून त्रास देणाऱ्या प्रेयसीची हत्या
औरंगाबादमध्येचे दोघांचे जुळले होते प्रेमसंबंध -आरोपी सचिन हा ठाणे पोलीस आयुक्त कार्यलयात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तर मृतक आशा औरंगाबादमधील एका रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. आरोपी सचिनची औरंगाबादमधील एका पोलीस ठाण्यात नेमणूक होती. त्यावेळी या दोघांमध्ये प्रेमसंबंध होऊन शारीरिक संबध प्रस्थापित झाले. विशेष म्हणजे आरोपी सचिन हा विवाहित आहे. त्यातच मृत प्रेयसी गेल्या काही दिवसांपासून आरोपी प्रियकराला वारंवार पैश्यांसाठी वेठीस धरून त्रास देत होती. तसेच औरंगाबाद सोडून उल्हासनगर राहण्यास तगादा लावत होती. त्यामुळे प्रियकर पोलीस कर्मचाऱ्याने मंगळवारी (१४ जून रोजी) रात्रीच्या सुमारास बहाण्याने बोलवून तिला स्वतःच्या वॅग्नर कार मध्ये बसवले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कारमध्येच तिचा गळा आवळून हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्या आदीच दोघेही आरोपी ताब्यात - हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने त्याचा मेव्हणा कल्पेश उर्फ केशव याला स्मशानभूमी जवळ बोलावले होते. मात्र, स्मशान नजीक एका ढाब्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची खबर विठ्ठलवाडी पोलिसांनी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वॅग्नर कारमधून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. शिवाय दोन्ही आरोपीना घटनास्थळी ताब्यात घेऊन दोघांना हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर आज बुधवारी (१५ जून ) हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांवर भादंवि कलम ३०२, २०१, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दोन्ही आरोपीना आज दुपारच्या सुमारास न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.
Last Updated : Jun 15, 2022, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details