महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder by love affair : शेजारी राहणाऱ्या प्रियकराने केली विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या - Murder by love affair

प्रेमसंबधातून शेजारी राहणाऱ्या विवाहित प्रेययसीची गळा चिरून हत्या ( Murder of married lover by slitting her throat ) केली. हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर ( Accused himself appeared at police station) झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल (case of murder registered in Manpada police station ) करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संदीप अहिरे असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

Murder by love affair
प्रेमसंबधातून प्रियकराने केली विवाहित प्रेययसीची गळा चिरून हत्या

By

Published : Dec 15, 2022, 9:08 AM IST

Updated : Dec 15, 2022, 9:49 AM IST

ठाणे : प्रेमसंबधातून शेजारी राहणाऱ्या विवाहित प्रेययसीची गळा चिरून हत्या ( Murder of married lover by slitting her throat ) केली. प्रियकराने धारदार ब्लेडने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण शीळ रोड टाटा नाका परिसरातील एका चाळीत घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे प्रेयसीची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर ( Accused himself appeared at police station) झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल (case of murder registered in Manpada police station ) करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संदीप अहिरे असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.


प्रेमसंबंधांमधून बाचाबाची :मृत ४४ वर्षीय विवाहित महिला पती व दोन मुलांसह कल्याण शीळ रस्त्यावरील पाईप लाईन परिसरात असलेल्या एका चाळीत राहत होती. तर आरोपी संदीप हा शेजारी राहत असून तो अविवाहित आहे. त्यातच मृत महिलेचे शेजारी राहणाऱ्या आरोपी संदीपशी सूत जुळून दोघात प्रेम संबंध निर्माण झाले. मात्र याच प्रेम संबंधांमधून मृत महिला आणि आरोपी संदीप यांची बाचाबाची होत असे. त्यातच बुधवार दुपारच्या सुमारास पुन्हा दोघामध्ये वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला कि, आरोपी संदीपने तिच्या राहत्या घरात तिच्या गळ्यावर धारधार ब्लेडने वार करून तिची जागीच निर्घृण हत्या केली.

आरोपीने स्वतः खून केल्याची कबुली दिली :हत्येनंतर पश्चाताप झालेला आरोपी संदीप याने स्वतः मानपाडा पोलीस ठाणे गाठत आपण शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून केल्याची कबुली दिली. मृत महिलेचा पती खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली. कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


Last Updated : Dec 15, 2022, 9:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details