महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shiva Temple Of Ambernath : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा - Shiva temple of Ambernath

श्रावण महिन्यामुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर ९६३ वर्षे जुने आहे. हे शिवमंदिर शिलाहार राजा मंबवानी यांनी 1060 मध्ये बांधले होते. हे शिवमंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते.

Shiva Temple Of Ambernath
Shiva Temple Of Ambernath

By

Published : Jul 30, 2023, 7:21 PM IST

शिवमंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा

ठाणे :अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावणमास उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. शिवमंदिरापासून मुख्य रस्त्यावरील कमानीपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सरु होता. पाऊस थांबल्यानंतर भाविकांची मंदिरात गर्दी दिसून येत आहे. प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात महिनाभरापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


शिलाहारकालीन मंदिर :अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिलाहारकालीन काळातील असून ते ९६३ वर्षांच्या काळात बांधले गेले आहे. या मंदिरातील महादेवाला अंबरेश्वर म्हणूनही ओळखले जाते. यावरुनच शहराचे नाव अंबरनाथ पडले आहे. ठाणे जिल्ह्यातील एकमेव प्राचीन मंदिर असल्याने मंदिर भगवान शिवाचे सर्वात पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारी ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात.

भाविकांची मंदिरात मोठी गर्दी :सध्या श्रावण महिना सुरू आहे. आज श्रावण महिन्यात रविवारची सुट्टी असल्याने भाविकांची मंदिरात मोठी गर्दी होते. विशेष म्हणजे बहुतांश भाविक उद्या श्रावण सोमवारचा उपवास करत आहेत. त्यामुळे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येतात. राज्यभरातून लाखो भाविक एकाच दिवशी शिवमंदिरात येतात. आज पवित्र श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी प्राचीन शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या आहेत. दुसरीकडे, भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पुरातन शिवमंदिरात पोलिसांनी कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन चोख बंदोबस्त ठेवला आहे.

जागतिक वारसा स्थळात मंदिराचा समावेश : UNESCO ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या 218 कला-समृद्ध स्मारकांपैकी हे शिव मंदिर भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. मंदिरावरील शिलालेखात मंदिर 1060 मध्ये पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे. हे मंदिर शिलाहार राजा मुम्बानी यांच्या काळात इ.स. १०६० मध्ये बाधण्यात आल्याचा शिलालेखावर उल्लेख आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details