ठाणे -लॉकडाऊनमुळे अनेक महिलांचे रोजगार गेले. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे घरातच कोंडून राहावे लागत असल्याने उदरनिर्वाह होणार कसा यान चिंतेत असलेल्या कोपरीतील महिलांना समाजसेविका समीक्षा मार्कंडे यांनी दिला पेन्सिल कारखान्याच्या माध्यमातून आधार दिला आहे. या मदतीमुळे अनेक महिलांची दोन वेळची जेवणाची चिंता मिटली आहे. शिवाय घर चालविण्यासाठी मोठा आधारही मिळत आहे.
ठाण्यात लॉकडाऊनच्या कठीण काळात समीक्षाने दिला अनेक महिलांना रोजगार - अनेक महिलांना रोजगार
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समीक्षा मार्कंडे या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी देखील आहेत. मात्र, महिलांच्या समस्या सोडविणे, त्यांना रोजगार मिळवून देणे असे विविध सामाजिक कार्य करीत असल्याने लॉकडाऊनमध्ये महिलांनी भेट घेऊन रोजगाराची समस्या मांडली. यावर पर्याय म्हणून स्वतः समीक्षा मार्कंडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कोपरात पेन्सिल बनविण्याचा कारखाना सुरू केला. यामाध्यमातून तब्बल ५० पेक्षा जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समीक्षा मार्कंडे या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी देखील आहेत. मात्र, महिलांच्या समस्या सोडविणे, त्यांना रोजगार मिळवून देणे असे विविध सामाजिक कार्य करीत असल्याने लॉकडाऊनमध्ये महिलांनी भेट घेऊन रोजगाराची समस्या मांडली. यावर पर्याय म्हणून स्वतः समीक्षा मार्कंडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कोपरात पेन्सिल बनविण्याचा कारखाना सुरू केला. यामाध्यमातून तब्बल ५०पेक्षा जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला. या पेन्सिलच्या कारखान्याच्या मदतीमुळे महिलांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने सुरू आहे. समाजसेविका समीक्षा यांनी पेन्सिल बनविण्याची महागडी मशीन कर्ज घेऊन विकत घेतली आणि हा कारखाना सुरू करून महिलांना पेन्सिलचे उत्पादन सुरू करण्यास मदत केली. शिवाय तयार होणाऱ्या पेन्सिलला बाजारपेठही मिळवून दिले आहे. त्यामुळे कोपरीतील असंख्य महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे.
हेही वाचा -परसबागेसाठी भाजीपाला बियाणे किट; संचारबंदीत महिला मजुरांनाही मिळाले काम