ठाणे - लोकलमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी स्टेशन परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 16 महागडे मोबाईल हस्तगत केले आहे. अनिलकुमार वर्मा असे या आरोपीचे नाव असून हा मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी आहे.
लोकलच्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल लंपास करणार सराईत चोरटा गजाआड
मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकात कामाच्या वेळाची लोकलमधील प्रवाशांची गर्दी तर सगळ्यांनाच परिचित आहे. अशाच गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लंपास करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरटा अनिलकुमार याने एकाच आठवड्यात लोकलमध्ये चढताना व उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे महागाडे मोबाईल लंपास केले आहेत.
गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे महागाडे मोबाईल लंपास - मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकात कामाच्या वेळाची लोकलमधील प्रवाशांची गर्दी तर सगळ्यांनाच परिचित आहे. अशाच गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लंपास करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरटा अनिलकुमार याने एकाच आठवड्यात लोकलमध्ये चढताना व उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे महागाडे मोबाईल लंपास केले आहेत.
16 महागडे मोबाईल चोरल्याची कबुली -कल्याण लोहमार्ग पोलीस अश्याच एक मोबाईल चोरीचा गुन्ह्याचा तपास करत असताना कल्याण स्टेशन परिसरात चोरटा अनिलकुमार हा संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आला. चौकशीदरम्यान त्याने 1 लाख 80 हजाराचे 16 महागडे मोबाईल चोरल्याची कबुली दिली. हे मोबाईल कुणाचे आहेत त्या मालकांचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर त्याच्यावर आणखी किती गुन्हे आहेत, याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी सांगितले.