नवी मुंबई (ठाणे) -सद्यस्थितीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मात्र, ओबीसी आरक्षण जाहीर केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थानी निवडणुका जाहीर करू नये, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन -
ओबीसी आरक्षण जाहीर केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुका घेऊ नये, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर ओबीसी आरक्षण न देता निवडणुका घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर ओबीसींना आरक्षण मिळावे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असेही म्हटले आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांच लसीकरण होणं गरजेचं -
कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांचा कोरोना या संसर्गजन्य विषाणूपासून बचाव होण्याकरीता अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्यावतीने व माथाडी हॉस्पिटल (ट्रस्ट) मार्फत कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बुधवारी माथाडी भवन, याठिकाणी विधानसभा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या १००० कामगारांना या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.